💥राज्य सरकारने एकदाच वापरल्या जाणाऱ्या व विघटन होऊ शकणाऱ्या प्लॅस्टिकवरिल बंदी केली शिथील.....!


💥मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्बंध शिथिल केले आहेत💥

✍️ मोहन चौकेकर

 राज्य सरकारने प्लॅस्टिकबंदी शिथील करण्याचा निर्णय घेतला असून, तशी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार, एकदाच वापरल्या जाणाऱ्या व विघटन होऊ शकणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंवरील निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.

* या वस्तूंवरील बंदी उठवल :-

एकदाच वापर होणाऱ्या व विघटनशील प्लास्टिकच्या वस्तूंवरील बंदी उठविली आहे. त्यामुळे स्ट्रॉ, ताटे, कप, प्लेट्स, ग्लास, काटे, चमचे, भांडे, वाडगे, कंटेनर या वस्तूंच्या वापरास मुभा असेल.प्लॅस्टिकच्या वस्तू विघटन होणाऱ्या असल्याबाबत ‘सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ प्लास्टिक इंजिनिअरिंग अण्ड टेक्नॉलॉजी’ व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्रमाणित करून घेणे उत्पादकांना बंधनकारक असेल सरकारने 1 जुलै 2021 रोजी कॅरी बॅग्ज, ताट- वाटया, ग्लास, काटे, चमचे, सुरी, स्ट्रॉ, कंटेनर, हवाई फुग्यांसाठी वारण्यात येणाऱ्या काडय़ा, प्लास्टिक ध्वज, मिठाई बॉक्स, निमंत्रण पत्रिका, सिगारेट पाकिटांवरील फिल्म, फलक, सजावटीच्या थर्माकोलवर बंदी घातली होती.

प्लॅस्टिक बंदीमुळे सुमारे सहा लाखांहून अधिक लोक बेरोजगार झाल्याचा दावा करत उद्योजकांनी ही बंदी उठविण्याची मागणी केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्बंध शिथिल केले आहेत......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या