💥पुर्णेतील वीर सावरकर चौक,आनंद नगर येथील दोन लोखंडी विद्युत खांबांवर बॅनर लावण्यास प्रतिबंध करण्याची मागणी....!


💥नगर परिषद मुख्यधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी💥 

पुर्णा (दि.०२ नोव्हेंबर) :- येथील गोपाळराव बाबुराव चिटणीस यांच्या घरासमोरील दोन लोखंडी विजेच्या खांबावर बॅनर लावण्यास मनाई करून कार्यवाही करण्याची मागणी गोपाळराव चिटणीस व अभिजित चिटणीस यांनी नगर परिषद मुख्यधिकारी यांना अर्जाद्वारे केली आहे.


आनंद नगर चौकातील दोन विजेच्या खांबावर नेहमीच मोठ मोठे बॅनर लावण्यात येत आहेत. सदरील बॅनर मुळे शाळा,महाविद्यालयास येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांना वाहतुकीस प्रचंड अडथळा निर्माण होत आहे.येथून ये-जा करणाऱ्या दुचाकी स्वरांना वाहनांना बॅनर मुळे रस्त्या पलीकडे वाहने दिसत नसल्याने कित्येक वेळा या चौकात अपघात झालेले आहेत. याच चौकात २०१६ मध्ये दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून दोन गटात वाद होऊन शहरात दंगल घडून आली होती. या मुळे काही काळ शहरातील कायदा व सुव्यवस्था ही बिघडली होती. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी ए जी खान व पोलीस निरीक्षक सोहन माच्छरे यांनी वेळीच हे प्रकरण आटोक्यात आणले व शहर पूर्ववत शांत केले. भविष्यात या चौकातील व शहरातील विना परवाना व वाट्टेल तिथे लावण्यात येणाऱ्या बॅनर बाजी मुळे शहरात अनुचित प्रकार घडू नये याकरिता वेळीच मा मुख्यधिकारी न प पूर्णा यांनी आनंद नगर चौकातील दोन विजेच्या खांबावर कुठल्याही प्रकारचे बॅनर अथवा होल्डींग लावू नये करीता योग्य ती कार्यवाही करावी चिटणीस यांनी दिलेल्या अर्जात नमूद केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या