💥महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या आज मंगळवार १३ डिसेंबर २०२२ रोजी झालेल्या बैठकीतील निर्णय (संक्षिप्त)....!


💥राज्यातील ग्रामीण भागात सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणार💥

 ✍️ मोहन चौकेकर 

✍🏻जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय. राज्यातील गावे पुन्हा जलसमृद्ध होणार. 

(मृद व जलसंधारण विभाग)

✍🏻जळगांव जिल्ह्यातील कुऱ्हा-वढोदा इस्लामपूर उपसा सिंचन योजनेला गती देणार. २२२६ कोटी सुधारित खर्चास मान्यता.

(जलसंपदा विभाग)

 ✍🏻आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणार

(आदिवासी विभाग)

✍🏻खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मनरेगा आणि इतर विविध विभागांची सांगड.

राज्यातील ग्रामीण भागात सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविणार.

(रोजगार हमी योजना)

✍🏻 गगनबावडा आणि  जत तालुक्यात मौजे संख येथे होणार ग्राम न्यायालय

(विधि व न्याय विभाग)

✍🏻शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणारी सलोखा योजना.  नाममात्र नोंदणी व मुद्रांक शुल्क आकारणारा

(महसूल विभाग)

✍🏻राज्यात काजू फळपिक विकास योजना लागू होणार. कोकणातील शेतकऱ्यांना होणार फायदा.

(कृषि विभाग)

✍🏻शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात ६० टक्के वाढ. वाचनसंस्कृतीला मिळणार बळ.

(उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

✍🏻कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करणार. कालबाह्य तरतुदी काढणार. कारावासाऐवजी  वाढीव दंडाची तरतूद

(कामगार विभाग)

 ✍🏻१३ सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी  शासनाने बँकेस देय असलेली रक्कम अदा करणार. 

(सहकार विभाग)

✍🏻पुणे जिल्ह्यातील आंबेगांव बु. येथील शिवसृष्टी प्रकल्पास ५० कोटी अनुदान देणार. 

(पर्यटन विभाग)

✍🏻स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची भरती प्रक्रियेला गती देणार

(सामान्य प्रशासन विभाग)

✍🏻पिंपरी चिंचवड विद्यापीठ आणि युनिव्हर्सल एआय विद्यापीठ, कर्जत या स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठांना मान्यता

(उच्च व तंत्रशिक्षण )

✍🏻महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि महाराष्ट्र सिनेमा अधिनियमात शिक्षेच्या सुधारित तरतुदी. ईज ऑफ डुईंग बिझिनेसाठी निर्गुन्हेगारीकरण करणार

(गृह विभाग )

✍🏻राज्यातील शाळांना अनुदान. ११०० कोटींना मान्यता

(शालेय शिक्षण)

✍🏻महाअधिवक्ता श्री आशुतोष कुंभकोणी यांचा राजीनामा स्वीकृत.

(विधी व न्याय)

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या