💥अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपलचा भिषण अपघात : ५ प्रवासी जखमी तर त्यातील २ जणांची प्रकृती चिंताजनक.....!


💥जिंतूर तालुक्यातील बोरी गावाजवळील घटना💥

जिंतूर प्रतिनिधी बि.डी.रामपूरकर

जिंतूर अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीप अपघातात पलटी होऊन अपघात झालेली घटना दि.०५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता जिंतूर तालुक्यातील बोरी येथील वाघीफाट्याजवळ घडली. याबाबत मिळालेलीमाहिती अशी की जिंतूर वरून परभणी कडेमॅक्स जीप क्रमांक एम एच १९९०१९ क्रमांकाची जीप भरगच्च प्रवासी घेऊन परभणी कडे जात असताना बोरी गावाजवळ वाघी फाट्यावर मोटरसायकलला वाचविण्याच्या प्रयत्नात जीपला अपघात होउन रस्त्याच्या खाली पलटी झाली. यातील ५ प्रवासी जखमी झाले असून त्यातील २ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली.

या घटनेची माहिती मिळतात काँग्रेसचे नागसेन भेरजे यांनी तात्काळ जखमींना आपल्या वाहनातून बोरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केली वैद्यकीय अधिकारी डॉ बी. के. पवार यांनी उपचार करून त्यातील दोन जणांना परभणी येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगितले. या जखमीमध्ये नागोराव रामकिसन नांदुरे ५५ वर्षी राहणार मानवत, विलास चांदोजी दिपके व ४६ राहणार जुनूनवाडी, सविता विठ्ठलराव जाधव ३५ राहणार जिंतूर, अंजली राहुल गायकवाड १३ निवळी, नूर जबी शेख नईम वय ३५ राहणार पालम, फराना शेख अश्फाक २२ वर्षे राहणार जिंतूर जखमी मध्ये आदीचा समावेश आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अनिल खिलारे यांनी भेट देऊन जखमीची विचारपूस केली अवैध प्रवासी वाहतूक करणान्या वाहनाने सध्या जिल्ह्यात डोके वर काढले असून याबाबत पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या