💥परभणी शहरातील हरवलेल्या मुलांची माहिती देण्याचे आवाहन....!


💥माहिती मिळाल्यास कोतवाली पोलिस स्थानकातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधाण्याचे आवाहन💥

परभणी (दि.08 डिसेंबर) : परभणी शहरातील अजमेर कॉलनी, साकला प्लॉट आणि एकमिनार मस्जीद भागातील प्रत्येकी एक याप्रमाणे तीन मुले हरवली आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरुन पोलीस शोध सुरु आहे.खालील वर्णनाचे तिघेही कुणाला आढळून आल्यास त्यांनी पोलिस निरीक्षक,कोतवाली पोलिस ठाणे, परभणी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


अजमेर कॉलनी येथील मोहमद हैदर यांनी दि. 6 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांचा मुलगा मोहम्मद युनुस वय सव्वाचार वर्षे हा 5 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता अज्ञान इसमाने फूस लावून पळवून नेले, अशी कोतवाली पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यावरून कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु. रं. नं. 29/2022 कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे वर्णन रंग गोरा, चेहरा लांबट, उंची 3 फूट, बांधा मध्यम, अंगावर निळ्या रंगाचा काळे पट्टे असलेला टी शर्ट व काळ्या रंगाची पँट आहे. या प्रकरणी कोणाला अशा वर्णनाचा मुलगा आढळून आल्यास त्यांनी पोलीस निरीक्षक एस. डी. ज-हाड यांच्याशी संपर्क साधावा.

दुसऱ्या प्रकरणात लंगोटे गल्ली, परभणी येथील शेख मुन्नीबी शेख आयुब यांच्या तक्रारीवरुन शेख हुजेर शेख आयुब वय 5 वर्षे हा 5 मार्च 2022 हा सकाळी 10 ते 5 वाजेदरम्यान अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार त्याची आईने दिली. शेख मुन्नीबी यांच्या आई पुतलीबी परळीला जात असताना शेख हुजेर हा त्यांच्या मागे पैसे दे म्हणत निघाला. मात्र नंतर तो आढळून आला नाही. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात मि.क्र. 64/2022 प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे. वर्णन रंग गोरा, उंची 3 फूट, बांधा सडपातळ, अंगावर लाल रंगाचे शर्ट व निळ्या रंगाची पँट आहे. या प्रकरणी कोणाला अशा वर्णनाचा मुलगा आढळून आल्यास त्यांनी पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा.

तिसऱ्या प्रकरणात परभणी शहरातील हल्ली मुक्काम एकमिनार मस्जीद दर्गा रोड येथील सफीया बेगम अर्शद खान यांच्या तक्रारीवरुन त्यांचा मुलगा बहिणीच्या मुलासोबत दि. 31 मार्च 2022 रोजी दुपारी 1 वाजता गल्लीत खेळायला गेला होता. त्यांच्या बहिणीचा मुलगा घरी परतला. मात्र त्यांचा मुलगा अदीश वय 8 वर्षे हा परतलाच नाही. त्याला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गु. रं. नं. 97/2022 कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्णन रंग गोरा, उंची 3 फुट 3 इंच, बांधा सडपातळ, अंगावर लाल-निळ्या रंगाचे पट्टे असलेले चेक्सचे फुल्लशर्ट, जांभळ्या रंगाची पँट, पायात काळी चमड्याची चप्पल आहे. त्याला हिंदी भाषा बोलता येते.  या प्रकरणी कोणाला अशा वर्णनाचा मुलगा आढळून आल्यास त्यांनी पोलीस निरीक्षक (मो. 9049980691 ) यांच्याशी संपर्क साधावा, असे पोलिस निरीक्षक, कोतवाली पोलिस स्टेशन, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या