💥पुर्णा तालुक्यातील गौर ग्रामपंचायत निवडणूक : मतदारांना घरकूलासह विहिरीचे अमिष दाखवून फसवण्याचा प्रयत्न...!


💥गौर गावकरी मतदार लबाडांच्या औतनाला पुन्हा एकदा बळी जाऊन गावाच्या विकासाची वाट लावणार काय ?- रामा पारवे


पुर्णा (दि.१६ डिसेंबर) - तालुक्यातील अत्यंत महत्वपुर्ण समजल्या जाणाऱ्या गौर ग्रामपंचायत निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी अंतीम टप्प्यात असतांनाच राजकीय लबाडांनी मतदारांना पुन्हा एकदा विकासाचे गोड गुळगुळीत गाजर दाखवून भुलथापा देण्यास सुरुवात केल्याचे निदर्शनास येत असून गावाच्या विकासासाठी सन २०२०/२०२१ या वर्षी शाळा,शौचालय दुरुस्,पाणी पुरवठा कामे,नळ फिटींग,आर ओ प्रणाली,शोषखड्डे व शौचालय बांधकाम,शाळा कंपाऊंड/उपकेंद्र कंपाऊंड,आंगणवाडी आरओ प्रणाली,अंगनवाडी शौचालय दुरुस्ती,अंगणवाडी फर्निचर,खेळणे खरेदी,मागासवर्गीय वस्तीत बंदिस्त नाली बांधकाम,मागासवर्गीय वस्तीत सिमेंट रस्ता नाली बांधकाम,बंदिस्त नाली बांधकाम,पाणी स्त्रोत अंतर्गत जागृत देवस्थान श्री सोमेश्वर देवस्थानचे बारव दुरुस्ती,आर.ओ.प्रणाली,शौचालय दुरुस्ती/घनकचरा,आर.ओ.प्रणाली शेड बांधकाम/खोली,स्मशानभुमी तारेच कुंपन,१०% प्रशासकीय खर्च आदी विकासकामांसाठी एकट्या १५ वा वित्त आयोगाचा एका वर्षात तब्बल २७ लाख ९७ हजार ६४५ रुपयांचा शासकीय विकासनिधी प्राप्त झाल्याचा लेखी तख्ता ग्रामपंचायत गौर कार्यालयात लावण्यात आला असला तरी सदरील विकास कामे प्रत्यक्षात झाली किंवा नाही ? या प्रश्नाचे उत्तर शोधणार तरी कौण ? 


गौर ग्रामपंचायतीला एका वर्षात जर जवळपास ३० लाखांचा शासकीय विकासनिधी प्राप्त झाला असेल तर ५ वर्षात किती शासकीय विकासनिधी प्राप्त झाला असेल ? असा प्रश्न गावातील तरुण तडफदार सामाजिक कार्यकर्ते रामा पारवे यांनी म्हटले असून गौर ग्रामपंचायतच्या माजी सरपंच पारवे यांनी मागील पाच वर्षात गावाच्या विकासासाठी आलेल्या कोट्यावधीच्या विकासनिधीची अक्षरशः धुळधान केली असून ग्रामदैवत असलेल्या जागृत श्री सोमेश्वर महादेव देवस्थानासह वन शहिद सदाशिवआप्पा नागठाने यांच्या नावावर देखील लाखो रुपयांची अफरातफर केला असल्यामुळे अश्या भ्रष्टाचाराचा कळस गाठलेल्यांना पुन्हा गौर ग्रामस्थ जनता निवडून देणार काय ? असा प्रश्न देखील रामा पारवे यांनी उपस्थित केला असून मागील पाच वर्षात ज्यांनी गावाचा यत्किंचितही विकास केला नाही ते आज गावातील भोळ्या भाबड्या जनतेला घरकुलासह विहिरीचे आमिष दाखवून पुन्हा एकदा फसवण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे गौर गावातील मतदार जनतेने या लबाडांच्या भुलथापांना बळी पडू नए असेही पारवे म्हणाले यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की गौर गावातील एकंदर परिस्थितीचा अभ्यास केल्यास या गावाच्या सर्वांगीन विकासासाठी केंद्र व राज्य सरकारणे कोट्यावधीचा शासकीय विकासनिधी दिल्यानंतर देखील यत्किंचितही विकास न झाल्यामुळे गावकरी मंडळींना अस म्हणायची वेळ आली आहे की 'गाव तस चांगल पण भ्रष्ट कारभाऱ्यांनी वेशीला टांगल' असेही पारवे म्हणाले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या