💥जिंतूर तहसील कार्यालयातील काही महिलांचे फोटो मॉर्फ करुन ते समाजमाध्यमांवर व्हायरल प्रकरण विधानसभेत...!


💥उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली गंभीर दखल : एका अधिकार्‍याची बदली तर दुसरा निलंबित💥


परभणी (दि.21 डिसेंबर) : परभणी जिल्ह्यातील जिंतूर तहसील कार्यालयातील काही महिलांचे फोटो मॉर्फ करुन ते फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याच्या प्रकरणात तीव्र उदासीनता दाखविल्याबद्दल जिंतूर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षकांची बदली तर सहाय्यक पोलिस निरीक्षकास निलंबित केले असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


        आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी या प्रकरणात विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केला. त्याद्वारे गृह खात्याचे लक्ष वेधले. काही दिवसांपूर्वी महिलांचे फोटो मॉर्फ करुन ते सोशल मिडीयातून व्हायरल होत होते. या बाबत काही महिला कर्मचार्‍यांनी तक्रार करण्याचे धाडस दाखविले नाही. परंतु, गुन्हेगारांचे मनोबल वाढल्यानंतर संबंधित आरोपींनी इतर काही महिलांचे काही फोटो देखील व्हायरल करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्‍वभूमीवर जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. परंतु, आरोपीच्या शोधासह तपासाच्या कामात पोलिसांनी फारसे गांभीर्य दाखविले नाही, अशी खंत व्यक्त केली. गृहमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात पोलिस निरीक्षक दिपक दंतूलवार यांची बदली केल्याचे व सहाय्यक पोलिस निरीक्षक नृसिंह पोमनाळकर यांना निलंबित केल्याची माहिती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या