💥महापरिनिर्वाण दिनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन...!


💥या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माजी सरपंच नेमाजी गाडे हे उपस्थित होते💥 

पुर्णा (दि.०७ डिसेंबर) - तालुक्यातील माखणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत काल मंगळवार दि.06 डिसेंबर 2022 रोजी ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.


या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून माजी सरपंच नेमाजी गाडे हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीचे अध्यक्ष श्री.शिवाजी आवरगंड,जनार्दन आवरगंड, गाडे,किशन आंबोरे,अनुरथ आवरगंड, संतोष आंबोरे,माधवराव आवरगंड ,राजू गाडे यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमात आरोही आवरगंड, भावना आवरगंड, तेजस्विनी आवरगंड,भाग्यश्री आंबोरे, कृष्णा शेरे,आरुषी आवरगंड, समिक्षा वाघमारे, मयुरी आवरगंड, क्रांती आवरगंड, दिव्या आवरगंड, मिलींद गाडे यांनी समुचित भाषणे केली.यानंतर माधव आवरगंड (माजी अध्यक्ष शा.व्य.समिती) ,पत्रकार जनार्धन आवरगंड ,राजू गाडे यांनी मनोगत व्यक्त केले.शाळेतील सहशिक्षक महाजन सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनचरित्रावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गजानन पवार यांनी तर आभार प्रदर्शन राजकुमार ढगे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेळके सर,झटे मँडम यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या