💥नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ प्राधिकरणावर स्वा.सै.सूर्यभानजी पवार महाविद्यालयाचे वर्चस्व...!


💥या निवडीमुळे स्वा.सै.सूर्यभानजीपवार महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे💥

पूर्णा (दि.०१ डिसेंबर) - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा (senea t) विद्यापरिषद (Academic council ) आणि अभ्यास मंडळावर ( Board of studies ) पूर्णा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाच्या निवडणून आलेल्या प्रतिनिधींनी  आपल्या कार्यातून वर्चस्व निर्माण केले आहे.विद्या परिषदेवर आंतरविद्याशाखीय गटातून पवार महाविद्यालयाच्या गृहविज्ञान विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ. सुरेखा भोसले, अधिसभेच्या खुल्या प्रवर्गातून स्वामुक्टा संघटनेचे विभागीय सचिव प्राध्यापक डॉ.विजय भोपाळे हे निवडून आले असून तत्वज्ञान विषयाच्या अभ्यास मंडळावर प्राध्यापक डॉ. प्रभाकर कीर्तनकार हे निवडून आले आहेत. 

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयाचे  प्रतिनिधी निवडून आल्यामुळे पवार महाविद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. विद्यापीठ क्षेत्रातील शैक्षणिक कार्यात अग्रगण्य असलेले हे महाविद्यालय विद्यापीठाच्याही विविध प्राधिकरणावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. पुढील काळात विद्यापीठ पातळीवर शैक्षणिक कार्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावणार असल्याची माहिती नवनिर्वाचित सदस्यांनी यावेळी दिली आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या