💥परभणी जिल्हा पोलिस दलातील 75 रिक्त जागांकरीता सोमवार दि.02 जानेवारी रोजी होणार पोलिस भरती...!


💥जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर.यांनी दिली माहिती💥

परभणी (दि.31 डिसेंबर) : परभणी जिल्हा पोलिस दलातील 75 रिक्त जागांकरीता सोमवार दि.02 जानेवारी 2023 रोजी पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पोलिस भरतीची प्रक्रिया होणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर. यांनी दिली.


          जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्रीमती रागसुधा आर यांनी परभणी जिल्हा पोलिस दलात रिक्त असणार्‍या जागांपैकी 75 जागांकरीता एकूण 4 हजार 900 अर्ज प्राप्त झाले आहेत, असे नमूद करीत या उमेदवारांना भरती प्रक्रियेकरीता सोमवारी सकाळी 5 वाजता जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर हजर राहण्याकरीता सूचना दिल्या आहेत, असे म्हटले.

         या पोलिस भरतीच्या निमित्ताने येणार्‍या सर्व उमेदवारांच्या सोयीकरीता वसमत रस्ता, जिंतूर रस्त्यावरील विसावा कॉर्नर व परभणीतील बसस्थानकापासून ते पोलिस मुख्यालयापर्यंत बसेसची व्यवस्थासुध्दा करण्यात आली आहे, असे स्पष्ट करीत श्रीमती रागसुधा आर यांनी संपूर्ण भरतीची प्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक , काटेकोरपणे व पारदर्शकपणे पार पडेल, असा विश्‍वास व्यक्त केला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या