💥जिंतूर येथे वेदांतकेसरी श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांची 53 वी पुण्यतिथी भक्ती भवाने साजरी....!


💥जिंतूरकरांचे गोल रिंगण ठरले आकर्षण💥 

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

संत परंपरेतील वारकरी संप्रदायाचे आणि वेदांतावर अभ्यासपूर्ण वक्ते वेदांत केसरी पदवी प्राप्त गुरुवर्य श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांची 53 वी पुण्यतिथी शोभायात्रा सह आज राज्यभरासह जिंतूर शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.


आज  शोभा यात्रेचे खास वैशिष्ट्य छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गोल रिंगण ठरले असून या मुळे जिंतूर शहरातील वातावरण भक्तीमय झाले दरम्यान पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त जिंतूर शहरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन महोत्सव व भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे जिंतूर शहरातील श्री नगरेश्वर मंदिर या ठिकाणी स्वामी महेश महाराज जिंतूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वेदांत केसरी श्री रंगनाथ महाराज परभणीकर गुरुजी यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दररोज ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण भागवत कथा हरिपाठ आणि दररोज रात्री हरी किर्तन असा भरगच्च कार्यक्रम संपन्न होत असून पुण्यतिथी निमित्त आज जिंतूर शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य दिव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत श्रीनगरेश्वर मंदिर येथे परत आली त्या ठिकाणी गुरुजींच्या पुण्यतिथी निमित्त दुपारी बारा वाजता गुलाल पुष्पवृष्टी करून जय जय कार करीत रामकृष्ण हरी गजर गजर  करून गुरुजींच्या पुण्यतिथीनिमित्त भक्ती भावाने वंदन करण्यात आले या शोभा यात्रेत कलशधारी महिला वारकरी संप्रदायातील बालकलाकार टाळकरी भक्त मंडळी व्यापारी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दरम्यान सप्याहात भागवत कथा बीड येथील सुप्रसिद्ध भागवत कथाकार ह भ प अमृत महाराज जोशी यांच्या सुमधुर वाणीतून संपन्न होत आहे दररोज हरी किर्तन सुप्रसिद्ध कीर्तनकारांची उपस्थिती या निमित्ताने राहणार आहे कीर्तन महोत्सवाचे हे अकरावे वर्ष असून यापूर्वीही अनेक विविध कार्यक्रम भक्ती गावाने जिंतूर तालुक्यात साजरे झालेले आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या