💥जिंतूर तालुक्यातील 33 ग्रामपंचायत सरपंच साठी १८३ तर २७९ सदश्यासाठी ६६० अर्ज झाले दाखल.....!


💥शेवटच्या दिवशी सरपंच व सदस्य पदाचे अर्ज भरण्यासाठी तालुक्यातील ३३ गावातील नागरिकांनी केली होती मोठी गर्दी💥 

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या सरपंच व २७९ सदस्यपदासाठी सार्वत्रिक निवडणूकीची प्रक्रिया सुरू आहे. जिंतूर शहरातील मौलाना अब्दुल कलाम आझाद सभागृहात फॉर्म स्वीकारणे सुरू होते.अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी दोन डिसेंबर रोजी सरपंच व सदस्य पदाचे अर्ज भरण्यासाठी तालुक्यातील ३३ गावातील नागरिकांनी मोठी गर्दी केली असल्याची पहावयास मिळाले.

प्रशासनाकडून अगोदर ऑनलाईन फॉर्म स्वीकारले जात होते मात्र अनेक ठिकाणी ग्रामीण भागात इंटरनेट व विजेची सुविधा नसल्यामुळे अनेक इच्छुकांना अर्ज भरता आले नाही. त्यामुळे शासनाच्या वतीने शेवटच्या दिवशी ऑफलाइन अर्ज घेण्याची परवानगी दिल्याने अर्ज भरण्यासाठी अनेक इच्छुकांनी गर्दी केली होती. यामध्ये शेवटच्या दिवशी पर्यंत तालुक्यातील एकूण ३३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी १८३ तर २७९ सदस्य पदासाठी ६६० अर्ज दाखल झालेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या