💥परभणी येथे शांतीदुत सेवाभावी संस्थेच्या वतीने 200 गरजू व्यक्तींना स्वेटरचे वाटप....!


💥जिल्हा पोलीस अधिक्षका श्रीमती रागसुधा आर यांच्या हस्ते स्वेटरचे वाटप करण्यात आले💥

परभणी (दि.04 डिसेंबर) - परभणी येथील शांतीदुत सेवाभावी संस्थेच्या वतीने हिवाळ्यात थंडी पासून बचाव करता यावा म्हणून आज रविवार दि.04 डिसेंबर 2022 रोजी 200 गरजू व गोरगरीब व्यक्तीना परभणीच्या जिल्हा पोलीस अधिक्षका श्रीमती रागसुधा आर यांच्या हस्ते स्वेटरचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांतीदूत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुभाषचंद्र सारडा हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रताप काळे,डॉ. दिनेश भुतडा,प्राचार्य सुरेश नाईकवाडे,,सौ. वर्षा सारडा ,सपोनि घायवट आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना श्रीमती रागसुधा यांनी   शांतिदुत गेल्या 25 वर्षांपासून शांतिदुत  गोरगरिबांना थंडी पासून बचाव करण्यासाठी  स्वेटर,गरम कपडे,ब्लँकेट वाटप करते .हा उपक्रम   स्तुत्य आहे . दर दिवाळीत कपडे वाटप,  आणि उन्हाळ्यात पाणी वाटप करून शांतिदुत ने आपली सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे म्हटले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव सारडा,केशव सारडा,बलराम सोमाणी,गौरव बाहेती,सेजल सारडा आदीने परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या