💥कोविड-19 च्या काळात मृत्यु झालेल्या अंगणवाडी सेविकेच्या वारसास देण्यात आला 50 लाख रुपयांचा धनादेश...!


💥बुलढाण्याचे जिल्हाधिकारी तुमोड यांच्या हस्ते देण्यात आला धनादेश💥  

✍️ मोहन चौकेकर                                                       

चिखली : कोविड-19 विषाणू चा प्रादुर्भाव संपूर्ण जगामध्ये सन 2019 मध्ये वाढला होता व 2020 मध्ये सुद्धा संपूर्ण भारतात हा विषाणू पसरत चालला होता .परंतु वेळीच भारत सरकारने आपल्या देशात लॉक ऊन घोषित करून भारता तील आरोग्य यंत्रने सह संपूर्ण विभागाच्या कर्मचाऱ्यांना हा विषाणू चा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कामाला लावले व अनेक कर्मचारी या विषाणू ने बळी पडले यात बालविकास प्रकल्प विभाग सुद्धा कामाला लागला होता त्यातच बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय नागरी प्रकल्प बुलडाणा अंतर्गत खामगाव बीट च्या अंगणवाडी सेविका रागिणी सदानंद कसबे या कोविड-19 मुळे कर्तव्य बजावत असताना दिनांक 07.05.2021 रोजी मृत्यू पावल्या. त्यांचे वारस त्यांचे पती दयानंद दौलतराव साबळे यांना 50 लक्ष रुपयाचा धनादेश शासनाच्या वतीने दिनांक 06.12.2022 रोज मंगळवार ला बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. ह.प.तुमोड साहेब ह्यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा बालविकास प्रकल्प अधिकारी तथा बालविकास प्रकल्प अधिकारी अरविंद लक्ष्मण रामरामे साहेब, खामगाव बीट च्या पर्यवेक्षिका सुरेखा जाधव, यांची उपस्थिती होती.मृत्यु झालेल्या अंगणवाडी सेविका ह्यांच्या कुटुंबातील वारसास 50 लक्ष रुपयाचा धनादेश मिळवून देण्यासाठी खामगाव बीट च्या सुरेखा जाधव,रंजना धोरण पर्यवेक्षिका विठ्ठल बुरकुटे यांनी व त्यांच्या कार्यालयतील अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या