💥पोलिस भरतीची जाहिरात येताच ग्रामीण भागातील मुलांची पोलिस भरती साठी तयारी सुरू....!

 


💥अनेक तरुण जिल्ह्यात काम नसल्याने पूणे मुंबई औरंगाबाद येथे कंपनी मध्ये काम करत आहेत💥

 शिवशंकर निरगुडे - हिंगोली

हिंगोली जिल्ह्यात अनेक तरुण अद्यापही बेरोजगार आहेत शिकून देखिल नोकरी लागत नाही हाताला काम मिळत नाही त्यामुळे अनेक तरुण बेरोजगार आहेत अनेक तरुण जिल्ह्यात काम नसल्याने पूणे मुंबई औरंगाबाद येथे कंपनी मध्ये काम करत आहेत. 

आत्ता हिवाळा चालु झाला आहे त्यामुळे आत्ता जिल्ह्यातील व ग्रामीण भागातील विध्यार्थी पोलिस भरती भरतीची जाहिरात येताच मुलांनी ग्राऊंडच्या तयारीची सुरुवात देखिल केली आहे जिल्ह्यातील सेनगाव हत्ता साखरा.बन बरडा.कापडशिंगि या सह जिल्ह्यातील अनेक गावातील तरुण मुलांनी पोलिस भरतीची तयारी चालु केली आहे.


 
कोविड मुळे अनेक दिवसा पासून पोलिस भरतीचा प्रश्न प्रलंबित होता मात्र आत्ता  बऱ्याच दिवसा नंतर पोलिस भरती साठी जागा निघाल्या आहे  त्यामुळे विध्यार्थी रोज सकाळी पाच वाजता उठून पोलिस भरती साठी सराव करत आहेत पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी उत्तम शारीरिक क्षमता आणि माफक शिक्षण असणाऱ्या युवकांसाठी पोलीस भरती प्रक्रिया महत्त्वाची ठरते. १८ वर्षे वयोगटातील युवकांना कायम स्वरूपी शासकीय रोजगार मिळविण्याचा हा एक राजमार्ग आहे.

राज्यातील युवक-युवतींसाठी राज्य सरकारतर्फे भरती प्रक्रिया राबवली जाते. इच्छुक उमेदवाराचे वय कमीत कमी १८ वष्रे व जास्तीत जास्त २५ वष्रे (मागासवर्गीय उमेदवारांना पाच वष्रे शिथिल) असावे. शैक्षणिक अर्हता- बारावी उत्तीर्ण (उच्च माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा)

शारीरिक पात्रता- महिला संवर्गासाठी उंची किमान १५५ सें.मी.तर पुरुष संवर्गासाठी उंची किमान १६५ सें.मी. असावी. नक्षलग्रस्त भागातील उमेदवार आणि खेळाडू यांना उंचीत अडीच सें.मी.ची शिथिलता दिलेली आहे. त्याचप्रमाणे शारीरिक मोजमापाचे आणखीही काही निकष आहेत. पोलीस बॅन्ड पदांसाठी वयोमर्यादा ही १८ वष्रे ते २५ वष्रे असून शासन निर्णयानुसार पाच वष्रे मागासवर्गीयांसाठी शिथिल आहे. परंतु त्यांची शैक्षणिक अर्हता ही दहावी पास (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा) पोलीस बॅन्ड पदासाठी शारीरिक पात्रतेचे निकष वेगळे आहेत. मात्र, वाद्याची माहिती आणि वाद्य वाजविण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या