💥दुधना डाव्या कालव्यावरील मटकऱ्हाळा चाऱ्यांची तात्काळ दुरुस्ती करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्या.....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाची कार्यकारी अभियंता कडे निवेदनाद्वारे मागणी💥

परभणी - तालुक्यातील मटक-हाळा येथून जाणा-या दुधना डावा कालव्या वरील चारी क्र. ७२ च्या मायनर व चाऱ्यांची दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी चाऱ्या फुटल्या आहेत त्यामुळे कालव्याचे पाणी टेल पर्यंत पोहचू शकत नाही त्या मुळे अनेक अनेक शेतकरी धरणात पाणी साठा असतांना देखील सिंचना पासून वंचित राहत आहेत. 

या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बागायती शेती असल्यामुळे येथे सिंचनासाठी पाणी पुरविणे आवश्यक आहे. या भागात दुधना डाव्या कालव्याच्या चारी क्र. ७२ चे मायनर आहेत परंतु ठिकठिकाणी त्या मायनर व चाऱ्या फुटलेल्या असल्याने शेतक-यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत नाही या बाबत परिसरातील शेतक-यांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे पाठपुरावा करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे अशी विनंती केली होती या मागणीची तात्काळ दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी मटकऱ्हाळा येथील शेतकऱ्यांसह माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० चे परभणी कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन दुधना डाव्या कालव्यावरील मटकऱ्हाळा चाऱ्यांची तात्काळ दुरुस्ती करून सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी निवेदना द्वारे केली आहे.

दुधना डाव्या कालव्याला सिंचनासाठी २० ते २५ नोव्हेंबर या कालावधीत पाणी सोडले जाणार आहे त्यामुळे तात्काळ या चाऱ्यांची दुरुस्ती होणे आवशक आहे. मटक-हाळा येथील शेतक-यांनी नियमाप्रमाणे पाणी मागणी अर्ज सादर केले असुन शासन नियमानुसार आकारण्यात येणा-या पाणीपट्टीचा भरणा करण्यास देखील संबंधीत शेतकरी तयार आहेत असे ही या निवेदनात म्हटले आहे निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, दिव्यांग आघाडी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर पंढरकर, शहर चिटणीस वैभव संघई, भगवतराव गरुड, मटकऱ्हाळा शाखा प्रमुख उद्धव गरुड, सचिन गरुड, गुलाब गरुड, संतोष गरुड, गजानन गरुड आदींच्या स्वाक्षर्या आहेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या