💥शिवसेनेच्या वतीने पारंपारिक पद्धतीने धूमधडाक्यात तुळशी विवाह साजरा....!


💥महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांच्या संयोजनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन💥

✍️ मोहन चौकेकर 

६ नोव्हेंबर.

संभाजीनगर/औरंगाबाद : शिवसेनेच्या वतीने आज (६ नोव्हेंबर) पारंपारिक पद्धतीने धूम धडाक्यात तुळशी विवाह साजरा करण्यात आला. विशेषता हिंदू रीतिरिवाजा नुसार गजानननगर येथील महारुद्र हनुमान मंदिर येथून मिरवणुकीने २१ नवरदेवाची वरात काढून गारखेडा परिसरातील स्वामी समर्थ केंद्रात हिंदू संस्कृती प्रमाणे वैदिक पद्धतीने मंगलाष्टकाच्या गजरात तुळशी विवाह लावण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे यांच्या संयोजनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

सुरुवातीला काढण्यात आलेल्या मिरवणुकीत ठीक ठिकाणी जोरदार आतिषबाजी तसेच नागरिकांनी ठीक ठिकाणी पुष्प वृष्टी करून मिरवणुकीचे स्वागत केले. बँड बाजाच्या तालावर विरोधी पक्षनेता अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, राजू वैद्य यांच्यासह वऱ्हाडी मंडळींनी जोरदार ठेका धरला होता.

यावेळी बोलताना विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे म्हणाले की हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण दीपावली हा वसुबारस पासून सुरू होऊन तुळशी विवाह पर्यंत सुरूच असतो, तुळशी विवाह याला खूप महत्त्व आहे. तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान विष्णू आणि तुळशीचे हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न लावले जाते, यानंतर सगळीकडे लग्नकार्य व इतर शुभ कार्याला सुरुवात होते.

 या कार्यक्रमागे हिंदू परंपरा संस्कृती जपण्याचा उदात्त हेतू असून, आजच्या लहान, तरुण मुला-मुलींना हिंदू संस्कृतीतील  विचार, आचार पद्धत समजली पाहिजे त्यांच्या मनात आपली संस्कृती रुजली पाहिजे, आपल्या संस्कृतीचा अभिमान असला पाहिजे या उद्देशाने अशा प्रकारच्या सामूहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.

याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे,  जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी, विधानसभा संघटक राजू वैद्य, स्वामी समर्थ केंद्राचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष विलासराव देशमुख, उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, विजय वाघचौरे, राजेंद्र दानवे,संचालिका अनुराधाताई दानवे, महिला आघाडी जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप, संपर्क संघटिका सुनीता आऊलवार, सह संपर्क संघटिका सुनीता देव, समन्वयक कला ओझा,दुर्गा भाटी, विद्या अग्निहोत्री राजश्री पोफले, ज्योति काथार, सुकन्या भोसले, मीनाताई गायके आदींची प्रमुख उपस्थिती होती तसेच परिसरातील माता भगिनी महिला शिवसेना पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या