💥महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे वक्तव्य करणाऱ्यांवर कार्यवाही करा...!


💥छत्रपती प्रतिष्ठानणे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली मागणी💥

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका सभेत बोलताना म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज हे आधीचे  आदर्श तर  सध्या चे नितीन गडकरी आदर्श आहेत अस वक्तव्य करून छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना एका राजकीय नेत्यांसोबत केल्याने सर्वत्र शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत व नवा वाद ओढावून घेतला आहे तर दुसरीकडे एका भाजपा प्रवक्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितल्याचे वक्तव्य करण्यात आले होते.


या दोन्ही घटनांन विरोधात छत्रपती प्रतिष्ठान आता आक्रमक झाला आहे छत्रपती प्रतिष्ठान कधीही छत्रपतींचा अवमान सहन करणार नाही व छत्रपतींचा अवमान करणार्यांवर लवकरात लवकर योग्यती कार्यवाही करावी व जर मा. राज्यपालांना छत्रपतींचा इतिहास व त्यांचा सन्मान माहित नसेल तर या असल्या राज्यपालांना लवकरात लवकर महाराष्ट्रा बाहेर करा असा निषेध व्यक्त करत छत्रपती प्रतिष्ठान चे अध्यक्ष पृथ्वीराज सुर्यवंशी, अजिंक्य कानबाले, युवराज खराबे व इतर छत्रपती प्रतिष्ठान चे सदस्य व शिवप्रेमींनी निवेदन दिले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या