💥जिंतूर येथे महा रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद.....!

                         


💥या महारक्तदान शिबीरात 118 रक्तदात्यांनी केले रक्तदान💥

                                                                                          जिंतूर प्रतिनिधी /  बि.डी.रामपूरकर

जिंतूर महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या आवाहनानुसार जिंतूर येथे राज्यप्रवाह प्रमाणे राज्यभरा प्रमाणे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.आज 118 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराला उस्फूर्तपणे प्रचंड प्रतिसाद मिळाला असून उद्घाटन करताना प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. दुर्गादास कान्हडकर यांनी रक्तदान ही काळाची गरज असून वेळोवेळी आवश्यक त्या रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यासाठी मोठी मदत मिळते आणि यातून सामाजिक सलोखा निर्माण होतो असे मत व्यक्त केले.


महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या आवाहनानुसार समाजभूषण नंदकुमार गादेवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरामध्ये एकाच वेळी आज महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने जिंतूर येथील श्रीनगरेश्वर मंदिर या ठिकाणी या शिबिराला उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ दुर्गादास कान्हडकर, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे तालुका वैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष डॉ. शिवप्रसाद सानप, पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार, डॉ.उन्मेष कोकडवार यांच्यासह कार्यक्रमाचे अध्यक्ष सखाराम चिद्रवार मंदिर समितीचे अध्यक्ष किरण वट्टमवार उपाध्यक्ष मुकुंद कोकडवार व्यासपीठावर उपस्थित होते.यावेळी उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. दुर्गादास कान्हडकर  यांनी रक्तदानाचे महत्त्व विशद करताना सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश यानिमित्ताने जातो रक्तदानातून राष्ट्रीय कार्याची प्रचिती येते असे मत व्यक्त करून रक्तदानाचे वैशिष्ट्य मांडले पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार यांनी रक्तदानातून अनेकांचे जीवन वाचते असे मत व्यक्त केले या वेळी सर्व समाजातील रक्तदात्याना रक्तदान करून सहकार्य केले प्रास्तावित राज्य संघटक प्रदिप कोकडवार,यांनी केले तर सूत्रसंचालन स्वप्नील येरमवार आभार आदित्य कोकडवार यांनी केले

यशस्वी साठी सुनील वट्टमवार,संजय कोकडवार,अशोक चिद्रवार,सचिन रायपत्रीवार, संतोष वाट्टमावर,नितीन कोकडवार, संजय वाट्टमवार,पांडुरंग वाट्टमवार, राजेश कोकडवार, गजानन कोकडवार, बाळू कवठेकर,सचिन चिद्रवार,आदी आर्य वैश्य पदधिकारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या