💥प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला आघाडीची शहर कार्यकारणी जाहीर.....!







💥शहर चिटणीसपदी ॲड.सुवर्णाताई देशमुख तर उपशहर प्रमुखपदी सुषमाताई देशपांडे यांची नियुक्ती💥

परभणी - प्रहार जनशक्ती पक्षाच्या जिल्हा कार्यकारणीची बैठक दि. ०८ नोव्हेंबर २०२२ रोजी पक्षाच्या जिल्हा जनसंपर्क कार्यालयात जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या बैठकी मध्ये सर्वानुमते प्रहार जनशक्ती पक्षाच्या महिला आघाडीच्या शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात समाजिक कार्यकर्त्या व विधीतज्ञ ऍड सुवर्णाताई देशमुख यांची परभणी शहर चिटणीसपदी तर समाजिक कार्यकर्त्या सुषमाताई  देशपांडे यांची परभणी शहर उपशहर प्रमुख या पदावर नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीचे पत्र प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने व महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके यांच्या हस्ते देण्यात आले.

या बैठकीस प्रहार जनशक्ती पक्षाचे  जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके, शहर प्रमुख धर्मेंद्र तुपसमुद्रे, शहर चिटणीस वैभव संघई, शेख बशीर यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या