💥औरंगाबाद जिल्ह्यात सर्वत्र गुरुवार दि.१ डिसेंबर रोजी शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन....!


💥असे विरोधी पक्ष नेते जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी कळविले आहे💥


✍️ मोहन चौकेकर 

औरंगाबाद (२९ नोव्हेंबर) - शेतकरी बांधव अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीमुळे आर्थिक विवंचनेत सापडला असून सध्या राज्यभर शेतकऱ्यांकडून वीज बिलाची सक्तीने वसुली सुरू आहे, पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडित केला जात आहे तसेच विमा कंपन्यांचा भोंगळ कारभार व दादागिरीच्या विरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या वतीने एकाच दिवशी एकाच वेळी संपूर्ण जिल्हाभर गुरुवार दिनांक १ डिसेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे विरोधी पक्ष नेते जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी कळविले आहे.

यात संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात शिऊर बंगला या ठिकाणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्य नेतृत्वाखाली तसेच सहसंपर्कप्रमुख ॲड आसाराम रोठे, महिला आघाडी जिल्हा समन्वयक आनंदीताई अन्नदाते उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे, संजय निकम यांच्या प्रमुख उपस्थितीत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.गंगापूर तालुक्यातील ईसारवाडी फाटा या ठिकाणी विरोधी पक्ष नेते जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली तसेच उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण भाऊ सांगळे, अविनाश पाटील, कृष्णा डोणगावकर, अंकुश सुंभ, जिल्हा युवा अधिकारी मच्छिंद्र देवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

कन्नड तालुक्यातील पिशोर नाका या ठिकाणी आमदार उदयसिंह राजपूत,उपजिल्हाप्रमुख अवचित नाना वळवळे महिला आघाडी उपजिल्हा संघटिका हर्षलीताई मुठ्ठे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे रत्नपुर तालुक्यात भक्तनिवास समोर महिला आघाडी जिल्हा संघटिका प्रतिभा जगताप यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे सिल्लोड तालुक्यात आंबेडकर चौक या ठिकाणी जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, उपजिल्हाप्रमुख सुदर्शन अग्रवाल, जिल्हा युवा अधिकारी कैलास जाधव यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे फुलंब्री तालुक्यात टी पॉइंट या ठिकाणी उपजिल्हाप्रमुख जगन्नाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.पैठण तालुक्यात सह्याद्री हॉटेल समोर या ठिकाणी उपजिल्हाप्रमुख अंकुश रंधे, महिला आघाडी जिल्हा संघटिका राखी परदेशी जिल्हा युवा अधिकारी शुभम पिवळ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार आहे.

करमाड तालुक्यात उपजिल्हाप्रमुख अशोक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनास उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, शेतकरी बांधव, नागरिकांनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाप्रमुख दिनेश मुथा, सचिन बंडू वाणी, सुभाष कानडे, संजय मोटे, राजू वरकड, रघुनाथ घडामोडे, दिलीप मचे, सोमनाथ करपे, मनोज पेरे, शंकर ठोंबरे, अनंत भालेकर, तालुका विधानसभा संघटक मनाजी मिसाळ, मनोज गायके, डॉ.अण्णा शिंदे, गणेश अधाने, रघुनाथ चव्हाण, अक्षय खेडकर, सोमनाथ जाधव,अमित वाहुळ, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका लताताई पगारे, हर्षलीताई मुठ्ठे, तालुका संघटिका अर्चना सोमासे, वैशाली जाधव, पल्लवी मोहिते, शशिकला बारगळ, वैशाली बदर, मंगला कापरे, तालुका युवा अधिकारी विठ्ठल डमाळे, योगेश पवार, आतिश देवगिरीकर,राजेंद्र तायडे ,विकास गोर्डे, आकाश लेंभे, ऋषिकेश धाट व शिवसेना संभाजीनगरच्या / औरंगाबाद वतीने करण्यात आले आहे......

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या