💥छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशारींना पदावरून बरखास्त करा...!


💥परभणी जिल्हा संभाजी सेनेने तिव्र निषेध करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी💥


परभणी (दि.२१ नोव्हेंबर) - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे  पदवी प्रदान सोहळ्यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले आहेत, छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत आहेत या पृथ्वीतलावर चंद्र, सूर्य असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना, बरोबरी कोणीही करू शकणार नाही अशा आमच्या दैवता बद्दल अपशब्द वापरून भगतसिंग कोसरी यांनी हिंदुस्थानातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. एका घटनात्मक पदावर असणाऱ्या जबाबदार व्यक्तीकडून असे बेजाबाबदार वक्तव्य करून समाजामध्ये द्वेष निर्माण करणे अशोभनीय आहे, त्यांच्याकडून शिवरायाप्रती केलेल्या वक्तव्याचा  संभाजी सेनेच्या वतीने जाहीर निषेध करून त्यांना जोडे मारून आंदोलन करण्यात आले तसेच राज्यपाल भगतसिंग कोषारी यांना पदावरून बरखास्त करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे संभाजी सेनेच्या वतीने आंदोलन करून करण्यात आली. सदरील आंदोलनामध्ये संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल तळेकर, शहराध्यक्ष अरुण पवार, जिल्हा संपर्कप्रमुख नारायण देशमुख,वि शहराध्यक्ष सोनू पवार, मराठवाडा उपाध्यक्ष ओमप्रकाश लड्डा, बाळासाहेब पानपट्टे, गंगाखेड तालुकाध्यक्ष अजय भिसे ,दिनकर गरुड,दिग्विजय रणवीर ,पवन कुरील ,पवन शिंदे, शिवाजी शिकरे, अभि कदम, रवी तांबे आदींसह कार्यकर्ते सहभागी  होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या