💥स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून "ऊस तोडणी बंद" आंदोलन सुरू : आंदोलनाची व्याप्ती वाढली.....!


💥सांगलीत वाहतूक रोखली,नाशिकमध्ये सर्व कारखाने बंद💥

सांगली : ऊसाच्या एकरकमी एफआरपी सहा विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून "ऊस तोडणी बंद" आंदोलन सुरू झाले आहे.

सांगली जिल्ह्यामध्ये ऊस दर आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. ठीक-ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ट्रॅक्टर आणि बैलगाड्यांच्या चाकांची हवा सोडून ऊस वाहतूक रोखण्यात येत आहे त्यामुळे जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे उसाला एक रकमी एफ.आर.पी. मिळावी तसेच उत्पादकांची वजनामध्ये होणारी लूट थांबवावी व वाहतूकदारांची सुरू असलेली फसवणूक थांबवावी,त्याचबरोबर साखरेला केंद्र सरकारने पाच रुपयांचा अधिकचा भाव द्यावा,

यासह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून १७ आणि १८ नोव्हेंबर २०२२ रोजी ऊस तोडणी बंद आंदोलनाची हाक देण्यात आली होती सांगली जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे सकाळपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ठिकठिकाणी सुरू असलेली ऊस वाहतूक बंद पाडण्यात आली. वाळव्याच्या हुतात्मा साखर कारखान्यासाठी सुरू असलेली ऊस वाहतूक स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडली.

इस्लामपूर-वाळवा रोडवर चार बैलगाड्यांच्या चाकांची हवा सोडून ऊस वाहतूक रोखून धरली आहे तर पलूस तालुक्यातल्या कुंडल या ठिकाणी संदीप राजोबा यांच्या नेतृत्वाखाली क्रांती साखर कारखान्यावर संतप्त कार्यकर्त्यांनी उसाचे ट्रॅक्टर अडवून धरले,यावेळी जोरदार घोषणाबाजी करत कारखान्याचं गेट बंद करण्यात आलं तसेच खानापूर तालुक्यात उदगिरी साखर कारखान्यासाठी सुरू असलेली ऊस वाहतूक जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांचे नेतृत्वाखाली बंद पाडली आहे,

खानापूर येथे ट्रॅक्टरची हवा सोडून, यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे कोणत्या मागण्यांसाठी आंदोलन मागील हंगामातील उसाचे उर्वरित दोनशे रुपये द्या दोन तुकड्यातील ‘एफ.आर.पी.’ बंद करा आणि साखरेच्या किमान दरात वाढ करण्याच्या प्रमुख मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. राज्यातील साखर कारखाने आणि साखर आयुक्तांकडे संघटनांनी मागण्यांचा रेटा लावला आहे नाशिकमध्ये सर्व कारखाने बंद नाशिक जिल्ह्यात कादवा सहकारी साखर कारखाण्यावर स्वाभिमानी प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वात ऊस वाहतूक रोखली आहे नाशिक जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने बंद करण्यात आले आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या