💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील कमलापूरात पत्नीची पतीने केली गळा कापून निर्घृण हत्या...!


💥हत्येनंतर धडापासून वेगळे केलेल्या शिरासह रक्ताने भरलेला कोयता हातात घेऊन फिरला आरोपी परिसरात💥

पुर्णा (दि.३० नोव्हेंबर) - पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील कमलापूर येथे पतीनेच आपल्या पत्नीची कोयत्याने गळा कापून निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना काल मंगळवार दि.२९ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ०९-०० वाजेच्या सुमारास घडली घटने नंतर निर्दयी आरोपी पतीने आपल्या पत्यृनीच्या कापलेल्या शिरासह हातात रक्काने भरलेला कोयता घेऊन परिसरात फेरफटका मारल्याने गावात सर्वत्र प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते या भयंकर घटनेतील आरोपी पती मनोरुग्न असल्याचे समजते.


या घटने संदर्भात सविस्तर वृत्त असे की ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील कमलापूर या गावात काल मंगळवार दि.२९ नोव्हेंबर २०२२ रोजी रात्री ०९-०० वाजेच्या सुमारास केशव गोविंद मोरे वय वर्षे ३८ या मनोरुग्न असलेल्या व्यक्तीने आपली पत्नी आशा केशव मोरे वय ३५ वर्षे हिची कोयत्याने गळ्यावर सपासप वार करीत अत्यंत निर्दयीपणे शिर धडापासून वेगळे करीत भयंकर हत्या केली हत्येनंतर आरोपी केशव मोरे याने आपल्या पत्नीचे शिरासह रक्ताने भरलेला कोयता हातात घेऊन परिसरात फिरण्यास सुरुवात केल्यामुळे गावात एकच खळबळ माजली सदरील गंभीर प्रकार पाहून प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले त्यामुळे त्याच्या जवळ देखील जाण्याची कोणी हिंमत केली नाही.

हत्या झालेल्या आशाबाई मोरे यांना एक मुलगा आणि दोन मुली असून सदरील घटनेवेळी संपूर्ण कुटुंब झोपलेले होते या घटने संदर्भात ताडकळस पोलिसांनी माहिती मिळताच ताडकळस पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विजय रामोड यांच्यासह सहकारी कर्मचारी संभाजी शिंदे,संतोष चाटे,काळे,दिपक बेंडे,चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली व आरोपी केशव मोरे यास ताब्यात घेऊन मयत आशाबाईचा मृतदेह घटस्थळ पंचणामा करून उत्तरीय तपासणीसाठी परभणी जिल्हा शासकीय रुग्नालयात पाठवण्यात आला असून या भयंकर  घटने मागील कारणाचा सखोल तपास ताडकळस पोलिस प्रशासन करीत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या