💥गुटखा बंदी कायद्याची अंमलबजावणी करा : संभाजी सेनेची मंत्री संजय राठोड यांच्याकडे मागणी...!


💥कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खुलेआम सर्व प्रकारच्या गुटक्यांची विक्री💥

परभणी : महाराष्ट्र राज्यामध्ये गेली दहा-बारा वर्षांपासून गुटखाबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे परंतु गुटखाबंदी केवळ कागदावरच असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खुलेआम गुटख्याची विक्री होताना दिसत आहे. गुटखा बंदीच्या नवीन सुधारित कायद्यानुसार गुटखा विक्री करणारा अथवा साठवण करणारास कलम 328 नुसार गुन्हा दाखल होऊ शकतो जो अजामीन पात्र आहे.

 परंतु या कायद्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खुलेआम सर्व प्रकारच्या गुटक्यांची विक्री होताना दिसत आहे महाराष्ट्र सरकारने राज्यांमध्ये गुटखाबंदी कायदा लागू करून शासनाला मिळणाऱ्या करोडो रुपयांच्या महसुलावर पाणी सोडले आणि महाराष्ट्र गुटखामुक्त अर्थात कॅन्सर मुक्त करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले परंतु त्याची कठोर अंमलबजावणी होत नसल्याने महाराष्ट्रात सर्व छोटे मोठे व्यावसायिक प्रत्येक ठिकाणी गुटख्याची खुलेआम सर्रास विक्री करताना दिसत आहेत .अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासन सतत छोट्या- छोट्या कारवाया करून गुटखा पकडण्याचा कांगावा करत आहे परंतु आजही परभणी सारख्या शहरांमध्ये दररोज दहा ते बारा लाख रुपयांचा गुटखा आवक केला जातो आणि किरकोळ स्वरूपात त्याची विक्री केली जाते. दररोज येणारा गुटखा शहरात कोणत्या मार्गे येतो आणि छोट्या व्यावसायिकापर्यंत त्याचे वितरण कशा पद्धतीने केले जाते याची पाहणी करून संबंधितावर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे दरम्यान संभाजी सेनेच्या वतीने गुटका बंदीच्या विरोधात अनेक वेळा आंदोलने करण्यात आलेली आहेत, तेव्हा सदरील कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी आणि गुटखा साठवणूक व विक्री करणारा कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संभाजी सेनेच्या वतीने अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदरील निवेदन संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, मराठवाडा उपाध्यक्ष ओमप्रकाश लड्डा, मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन लाव्हाळे, शहराध्यक्ष अरुण पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सदरील निवेदन दिले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या