💥पूर्णा रेल्वे स्थानकावरील विविध प्रश्नांसंदर्भात भारतीय जनता पक्षाचे निवेदन....!


💥भाजपने प्रवासी समस्यांकडे दक्षिण मध्य रेल्वेचे निवेदनाद्वारे वेधले लक्ष💥

पूर्णा रेल्वे स्थानकावर फार मोठ्या प्रमाणात असुविधा असून त्यामुळे पूर्णा भाजपा तर्फे दक्षिण मध्ये रेल्वे चे लक्ष वेधले असुन त्याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देत त्या दूर करून प्रवाशांना दिलासा द्यावा ही विनंती करण्यात आली आहे.

1) स्वच्छतागृह  प्लॅटफॉर्म क्रमांक 02 वर उपलब्ध नाही आणि  दोन प्लॅटफॉर्मवर आहेत परंतु ते संपूर्ण बंद आहेत.

2) रेल्वे स्थानकावर स्वच्छतेचा अभाव असल्याने मोठे दुर्गंधी असते खाजगी कॉन्ट्रॅक्टदार व्यवस्थित स्वच्छतेकडे काळजी देत नाहीत असे दिसून येत आहे.

3) रेल्वे स्थानकावर मोकाट जनावराचा सदैव घुडदुस सुरू असते त्यात गायी,कुत्रे, गाढव, शेळ्या यांचा समावेश आहे प्रवाशांना यांच्यापासून सातत्याने इजा होत असते.

4)पूर्वी कंट्रकदाराने नेमलेल्या सफाई कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात घट केल्याचे दिसून येत असून स्थानिक व्याप्ती लक्षात घेऊन मुबलक साफसफाई कर्मचारी नियमावेत व त्यांची मोकाट जनावरे हाकलावीत. 5)रेल्वे स्थानक व बाहेरील गार्डनची देखभाल ही स्टेशन प्रबंधंक यांनी लक्ष देऊन केली जावी.

6)मद्यपी व गुन्हेगारांचे हे ठिकाण अड्डे बनले असून त्यावर उपाययोजना करावे.

7)रेल्वे स्थानकावर शुद्ध पिण्याचे पाणी याची व्यवस्था करावी.

असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

सदरील निवेदन भाजपा युवा मोर्चा तर्फे देण्यात आले असून निवेदनावर भाजपा शहराध्यक्ष प्रशांत कापसे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अजय ठाकूर,जिल्हा संयोजक विजय कराड,युवा जिल्हा उपाध्यक्ष विनय कराड,युवा तालुकाध्यक्ष देवानंद वळसे,तालुका संयोजक ऍड.गोविंद ठाकूर यांच्या उपस्थितत पूर्णा रेल्वे स्टेशन मास्टर मार्फत डी.आर.एम नांदेड यांना पाठवण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या