💥सोयाबीनच्या गंजीला आग लागून शेतकऱ्याचे दोन लाखाचे नुकसान हिंगोली जिल्ह्यातील घटना......!

 


💥परमानंद विठ्ठल मुटकुळे या शेतकऱ्याच्या शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला लागली आग💥

 शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील सुलदरी बुद्रुक येथील शेतकरी परमानंद विठ्ठल मुटकुळे  या शेतकऱ्याच्या शेतात कापून ठेवलेल्या सोयाबीनच्या गंजीला आग लागली. त्यामध्ये अंदाजे 20 क्विंटल सोयाबीन जळून खाक झाले आहे. त्यामुळे त्यांचे अंदाजे दोन ते दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

या वर्षी मुळातच पाऊस एक महिना उशीरा आल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या लांबल्या. पदरमोड करीत, कर्ज काढून, उसणवार करीत अनेक शेतकऱ्यांनी डोळ्यात हिरवे स्वप्न रंगवत पेरणी केली. मात्र जुलै महिन्यापासून ते सोयाबीन काढणीच्या हंगामापर्यंत सतत बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांची पाठ साेडली नाही. त्यामुळे हातात पिक येणार की नाही, ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावत होती.

संततधार पाऊस व अतिवृष्टीचया तारातही पिकाने कसातरी तग धरल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र कुठे निसर्गाच्या अवकृपेने, तर कुठे रसातळाला गेलेल्या माणसुकीने शेतकऱ्यांच्या भरघोस उत्पन्नाच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. असाच काहीसा प्रकार तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे घडला.

या वर्षी मुळातच अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला  पदरमोड करीत, कर्ज काढून, उसणवार करीत अनेक शेतकऱ्यांनी डोळ्यात हिरवे स्वप्न रंगवत पेरणी केली. मात्र जुलै महिन्यापासून ते सोयाबीन काढणीच्या हंगामापर्यंत सतत बरसणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांची पाठ साेडली नाही. त्यामुळे हातात पिक येणार की नाही, ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावत होती.संततधार पाऊस व अतिवृष्टीचया तारातही पिकाने कसातरी तग धरल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र कुठे निसर्गाच्या अवकृपेने, तर कुठे रसातळाला गेलेल्या माणसुकीने शेतकऱ्यांच्या भरघोस उत्पन्नाच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे. असाच काहीसा प्रकार सेनगाव तालुक्यातील घडला आहे 

सेनगाव तालुक्यातील सुलदली बुद्रुक   येथील शेतकरी परमानंद विठ्ठल मुटकुळे यांच्या गट क्रमांक 102 मध्ये  ,रात्रीच्या सुमारास लागलेल्या आगीमुळे जवळपास तीन एकरातील सोयाबीन सुडीचे नुकसान झाले असून दीड ते दोन लाख रुपयांचे सामान्य शेतकऱ्यांना ही झालेली नुकसान मोठ्या प्रमाणात असून संबंधी शेतकऱ्यांनी शासन दरबारी मदतीची मागणी केलेली आहे सदरील झालेल्या घटनेचा पंचनामा तलाठी श्री जाधव ,पोलीस पाटील ,सरपंच यांनी केला असून राष्ट्रवादी युवक प्रदेश सचिव परमेश्वर इंगोले यांनी त्यांना मदत मिळावी ही मागणी केलेली आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या