💥परभणी तहसिल कार्यालयातील अनाधिकृत गौणखनिज वाहतूक केलेल्या वाहनांचा लिलाव.....!


(फाईल चित्र) 

💥या वाहनांचा लिलाव करुन सदरील स्वामित्वधन आणी दंडाची रक्कम वसूल करणे आवश्यक झाले आहे💥 

परभणी (दि.18 नोव्हेंबर): तहसिल कार्यालय परभणी येथे अनाधिकृत गौणखनिज वाहतूक केल्याप्रकरणी विविध दिनांकास खालील वाहने जप्त करण्यात आली होती. संबंधीत वाहन धारकांना वेळोवेळी नोटीस देवूनही स्वामित्वधनाची रक्कम आणी दंड शासकीय तिजोरीत जमा करणे बाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तथापि, वाहन क्रमांक एमएच 04 इबी -7085 (टिप्पर) मधुकर सखाराम बिराजदार, रा. आय.टी.आय. कॉर्नर जिंतूर रोड परभणी व एमएच 12 क्युजी 5466 (टिप्पर) साजेद अन्सारी, परभणी या वाहनांच्या मालकांनी अद्यापही अनाधिकृत गौण खनिज वाहतूक प्रकरणी तहसिल कार्यालयाला संपर्क साधलेला नाही. त्यामुळे या वाहनांचा लिलाव करुन सदरील स्वामित्वधन आणी दंडाची रक्कम वसूल करणे आवश्यक झाले आहे.

या जाहीर नोटीसव्दारे शेवटची संधी म्हणून वरील वाहनधारकांना पुन्हा एकदा अनाधिकृत गौण खनिज वाहतूक प्रकरणी स्वामित्वधन आणी दंडाची रक्कम अदा करण्याची अंतीम संधी देण्यात येत आहे. सदरील वाहनधारकांनी दिनांक 25 नोव्हेंबर 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत तहसिल कार्यालय परभणी येथे आदेशीत केल्यानुसार स्वामित्वधन आणी दंडाची रक्कम अदा करावी अन्यथा खालील वाहनांचा जाहीर लिलाव करण्यात येईल आणी त्यानंतर कोणत्याही वाहनधारकाची कोणत्याही प्रकारची कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही असे आवाहन परभणीचे उपविभागीय अधिकारी डी.बी. शेवाळे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या