💥नांदेड येथील पवित्र सचखंड गुरुद्वारात सुखमनी साहेबच्या पाठांचे आयोजन....!


💥शिख धर्माचे 9 वे गुरु श्री गुरु तेगबहादुरजी यांच्या येत्या शहीदी दिवसाला समर्पित श्री सुखमनी साहेबच्या पाठांचे आयोजन💥 

नांदेड (दि.23 नोव्हेंबर) :  येथील गुरुद्वारा तखत सचखंड साहेब येथे "गुरु का खालसा" संस्थेच्या माध्यमाने दि. 24 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान शीख धर्माचे 9 वे गुरु, श्री गुरु तेगबहादुरजी यांच्या येत्या शहीदी दिवसाला समर्पित श्री सुखमनी साहेबच्या पाठांचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती गुरु का खालसा संस्थेचे अध्यक्ष स. कश्मीरसिंघ भट्टी यांनी येथे दिली. तखत साहेबचे माननीय जत्थेदार साहेब आणि पंजप्यारे साहेब यांच्या सन्निध्यात तसेच गुरुद्वारा बोर्डाच्या प्रोत्साहनाने दि. 28 रोजी श्री गुरु तेगबहादुरजी यांचा शहीदी दिवस पाळण्यात येत आहे. या निम्मित प्रतिदिन सायंकाळी 7.30 ते 10 वाजता दरम्यान सुखमनी साहेबचे पाठ आणि कथा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वरील कार्यक्रमात सर्वांनी सहभाग घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या