💥परभणी येथील प्रशासकीय इमारतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असोल्यातील नुतन कार्यालयात स्थलांतरित....!


💥सोमवार दि.१४ नोव्हेंबर पासून असोला येथून अनुज्ञप्ती मिळणार💥

परभणी (दि.११ नोव्हेंबर) : परभणी येथील प्रशासकीय इमारतीतल्या तळमजल्यातील उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथून मौ.असोला येथील नव्याने बांधकाम झालेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नुतन इमारतीत स्थलांतरित झाले आहे.

त्यामुळे सोमवार दि.१४ नोव्हेंबर २०२२ पासून शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्की अनुज्ञप्ती चाचणीचे कामकाज मौ.असोला येथील कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या नव्या जागेत पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात येणार आहे, याची सर्व अर्जदारांनी, वाहनधारकांनी व जनतेने तसेच मान्यता प्राप्त मोटार ट्रेंनिग स्कूल संचालकांनी नोंद घ्यावी, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या