💥एकात्मिक शेती व गांडूळ निर्मिती प्रशिक्षण संपन्न.....!


💥यामध्ये मुख्य अतिथी म्हणून अच्युत रेडे तालुका व्यवस्थापक उमेद अभियान यांची उपस्थिती💥 

गंगाखेड (दि.२३ नोव्हेंबर) - रिलायन्स फाउंडेशन,उमेद व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्दारका फंक्शन हॉल येथे एकदिवसीय एकात्मिक शेती पद्धती व गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये मुख्य अतिथी म्हणून अच्युत रेडे तालुका व्यवस्थापक उमेद अभियान,तसेच सुधाकर शिंदे (प्रगतिशील शेतकरी तथा गांडुळ खत निर्मिती तज्ञ),संभाजी कांबळे  क्रिशाल फौंडेशन ), राजेभाऊ खोडवे तालुका व्यवस्थापक सुमिंतर इंडिया आर्गानिक तसेच रोहिदास निरस सि.इ.ओ.अंजटा शेतकरी उत्पादक कंपनी यांची विशेष उपस्थिती होती.


वाढत्या रासायनिक खतांचा व कीटकनाशकांच्या अति वापराने दिवसेंदिवस शेतीची सुपीकता कमी होत चालली आहे. तसेच शेतीची उत्पादन क्षमता देखील कमी होत आहे. तसेच त्याचा मानवी शरीरावर देखील दूरगामी परिणाम होत आहेत. यासाठी एकात्मिक शेती पद्धती तसेच शेतामध्ये जास्तीत जास्त गांडूळ खत,शेणखत,इतर शेंद्रिय खतांचा  वापर करणे गरजेचे आहे.

रिलायन्स फाउंडेशन च्या माध्यमातून यासाठी तालुका स्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते बचत गटांच्या माध्यमातून गाव स्तरावर गांडूळ खत निर्मिती प्रकल्प तयार करून त्याची ब्रँडिंग, पॅकेजिंग, लेबलिंग व मार्केटिंग साठी महिलांना व शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणे हा या प्रशिक्षनाचा उद्देश होता.

या दरम्यान बोलतांना अच्युत रेडे सर यांनी महिलांना शेंद्रिय शेतीचे फायदे,भविष्यातील संधी व उपलब्ध बाजारपेठ,गांडूळ खत निर्मितीचे फायदे,पीक पद्धती,भाजीपाला लागवड व विक्री व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच जास्तीत जास्त महिलांनी गांडूळ खत निर्मीती प्रकल्प सुरू करून त्याद्वारे आपल्या उत्पन्नात वाढ करण्याचे आवाहन यावेळी बोलताना केले. यावेळी महिलांना  व शेतकऱ्यांना  ६०गांडूळ बेडचे वाटप रिलायन्स फाउंडेशन च्या माध्यमातून करण्यात आले.  

पुढे राजेभाऊ खोडवेसरांनी महिलांना एकात्मिक शेती पद्धती संकल्पना समजावून सांगितली. त्यामध्ये शेतातील काडी करचा व्यवस्थापन, रायझोबियम प्रक्रिया,हवामान आधारित शेती आदी विषयांवर मार्गदर्शन केले.

तसेच सुधाकर शिंदे व संभाजी कांबळे यांनी महिलांना व शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनी,शेंद्रिय शेती,गांडूळ खत निर्मिती कशी करायची व त्याची प्रक्रिया,तसेच त्याचे फायदे व व्यावसायिक संधी या विषयी मार्गदर्शन केले.

सदरील प्रशिक्षनासाठी गंगाखेड तालुक्यातील ६३ महिला व पुरुष यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश चव्हाण(पी  ए फ .रिलायन्स फाउंडेशन) यांनी केले तर  सूत्रसंचालन विलास काळे (तालुका समन्वयकR.F.) यांनी केले. आभार लक्ष्मण देवकते  यांनी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुरलीधर मुंढे व उमेद च्या तालुका स्तरीय टीमचे सहकार्य लाभले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या