💥अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या पदाची गरिमा पाहून तात्काळ राजीनामा द्यावा - प्रेक्षा विजयराव भांबळे


💥जिंतूर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून अब्दुल सत्तारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत करण्यात आला जाहीर निषेध💥 


जिंतूर प्रतिनिधी / बी.डी. रामपूरकर 

आज ९ नोव्हेंबर, रोजी जिंतूर येथे भारत देशाच्या सर्वोच्च संसद सभागृहातील संसदरत्न पुरस्कार मिळवणाऱ्या आदरणीय खां.सौ.सुप्रियाताई सुळे यांना उद्देशून अपशब्द वापरणाऱ्या अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्यास परभणी राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस जिल्हाध्यक्षा प्रेक्षा विजयराव भांबळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली  प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याचे दहन करण्यात आले.

अब्दुल सत्तार यांना सत्तेचा किती माज आलेला आहे हे सरकार महिलेविषयी कोणत्या न कोणत्या कारणाने मानसन्मान करण्याएवजी नेहमी अपमान करत आहे. महिला खासदाराच्या विरोधात मंत्रीमंडळातील एक मंत्री अपशब्द वापरतो याची दखल मा.मुख्यमंत्री यांनी तात्काळ घ्यावी व अब्दुल सत्तार चा तात्काळ राजीनामा घ्यावा. तात्काळ राजीनामा नाही घेतला तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला.

यावेळी पृथ्वीराज भांबळे, प्रसादराव बुधवंत, रामराव उबाळे, मनोज थिटे, मनीषा ताई केंद्रे, आशाताई उबाळे, आशाताई खिल्लारे, बाळासाहेब भांबळे, गणेशराव इलग, विजय खिस्ते, शौकत लाला, मकसूद पठाण, शरद अंभूरे, शाहेद बेग मिर्झा, शोएब जानीमिया, चंद्रकांत बहिरट, बंटी निकाळजे, दल्मीर पठाण, हकीम लाला, अक्कू लाला, गजानन कांगणे, हनुमान भालेराव,  पिणु काळे, मधुकर ढवळे यांच्यासह अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या