💥जगणं समृद्ध करणारी चळवळ म्हणजे संभाजी ब्रिगेड - साहेब शिंदे


💥पूर्णा येथील मराठा सेवासंघ कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते💥

पूर्णा (दि.15 नोव्हेंबर) - "संभाजी ब्रिगेड म्हणजे तरुणांना उद्योगप्रवण बनवणारी, विधायक मार्गावर चालायला शिकवणारी, मानवतावादी मूल्यांची जोपासणा करणारी आणि माणसाचं जगणं समृद्ध करणारी चळवळ आहे. म्हणूनच तरुणांना संभाजी ब्रिगेडचे आकर्षण आहे!" असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव शिवश्री साहेब शिंदे यांनी केले. 

     पूर्णा येथील मराठा सेवासंघ कार्यालय येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पूर्णा येथे संभाजी ब्रिगेड तालुुक्याच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून संभाजी ब्रिगेडचे जिल्हा सचिव शिवश्री साहेब शिंदे यांची उपस्थिती होती. शिवश्री शिवाजी बोबडे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवश्री गंगाधर कदम, शिवश्री भगवानराव दुधाटे, शिवश्री दिगंबर बोबडे, शहराध्यक्ष शिवश्री करण शिंदे, तालुका कार्याध्यक्ष शिवश्री राजूभैय्या जोगदंड, तालुका उपाध्यक्ष शिवश्री अविनाश पौळ, शिवश्री दिलीप भोसले, तालुका सचिव शिवश्री बालाजी बिलाल, गंगाखेड विधानसभा अध्यक्ष शिवश्री भरत बोबडे, स्वप्निल कदम, कंटीराम बोबडे, शिवश्री नवनाथ चाफाकानडे, व्यंकटी ढोणे, जीवन ढोणे, शिवराज कांळबाडे आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

     कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ पूूजन व जिजाऊ वंदनेने करण्यात आली. यावेळी शिवश्री गंगाधर कदम यांनी आपल्या मनोगतातून तालुक्यातील कार्याचा आढावा मांडला. तर शिवश्री दिलीप भोसले, शिवश्री अविनाश पौळ यांनी मनोगत व्यक्त केले. शिवश्री शिवाजी बोबडे यांनी प्रास्ताविक केले तर भरत बोबडे यांनी उपस्थितांचे आभार मानले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या