💥दिपस्तंभ प्रतिष्ठान तर्फे परभणी जिल्ह्यातील उपक्रम शिक्षकांचा राजभवन मुंबई येथे सत्कार......!


💥कार्यक्रमाला दिपस्तंभ प्रतिष्ठानच्या मार्गदर्शिका व जिंतूर-सेलूच्या आमदार मेघना बोर्डीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती💥


जिंतूर प्रतिनिधी  / बी.डी. रामपूरकर

दिपस्तंभ प्रतिष्ठान, परभणी या संस्थे तर्फे आयोजित 'आमदार उपक्रमशील शिक्षक सन्मान २०२२' या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते परभणी जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांचा राजभवन, मुंबई येथे सत्कार करण्यात आला.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश प्राप्त करणाऱ्या जिंतूर येथील शुभम रोहिदास शिंदे या विद्यार्थ्याचा देखील सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या मार्गदर्शिका व जिंतूर - सेलू येथील आमदार मेघना साकोरे बोर्डीकर व नूतन शिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. विनायक कोठेकर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या