💥'ती' कोणत्याही बंधनात न अडकता राष्ट्रीय पातळीवर खेळणार....!


💥एचएआरसी संस्थेने पालकत्व स्वीकारलेल्या राजनंदिनी ची राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड💥 

नुकत्याच नंदुरबार येथे झालेल्या राज्यस्तरीय शूटिंग बॉल स्पर्धेत  राजनंदिनी वाघमारे हिने तिच्या खेळात कौशल्य गाजवत तिची तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय शूटिंग बॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आज त्यानिमित्ताने होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज तर्फे तिला स्पोर्ट्स किट - स्पोर्ट्स ट्रॅक सूट, शूज, नी गार्ड व संबंधित 3600/- किंमतीचे क्रीडा साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रवास व इतर खर्च साठी 5000/- रुपये चेक देऊन मदत केली आहे. या प्रसंगी डॉ पवन चांडक, अरुणकुमार ओझा, सौरभ भंडे, ऍड अनुराधा गायकवाड, विमल वाघमारे उपस्थित होते. 

पार्श्वभूमी: राजनंदिनी वाघमारे जीची आई तमाशा कलावंत तर आज्जी एके काळी वेश्या व्यवसायात होती परंतु या व्यवसायातील परिस्थिती पाहता तिने नंदिनी च्या 12 व्याच वर्षी ठरवले की मी तिला या व्यवसायात पडू देणार नाही. जुलै 2020 पासून नंदिनी ची शिक्षणाची इच्छा पाहता व त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज संस्थेने तिचे पालकत्व स्वीकारले. तिला 2020 पासून संपूर्ण शैक्षणिक गरजा पूर्ण केल्या. त्यावर्षी कोविद मुळे शाळा बंद होत्या तेंव्हा ऑनलाइन शिक्षण साठी स्मार्टफोन घेऊन दिला ज्यामुळे 10 वित ती चांगल्या मार्क्स ने उत्तीर्ण झाली. पुढे तिला मराठी व इंग्रजी टायपिंगचे प्रशिक्षण देऊन तिचा संपूर्ण खर्च एचएआरसी संस्थेने केला. टायपिंग च्या मराठी व इंग्रजी दोन्ही परीक्षा 86/100 मार्क्स ने पास झाली. 

तिला शूटिंग बॉल स्पर्धेतील आवड पाहता वेळोवेळी तीला मदत केली. आज बघता बघता 8 महिन्यात जिल्हा पातळी, विभागीय पातळी, राज्य पातळीवर स्वतःच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीवर नंदुरबार येथे झालेल्या स्पर्धेत तिची राष्ट्रीय पातळीवर निवड झाली.     पुढील महिन्यात तामिळनाडू येथे होणाऱ्या स्पर्धेत ती नॅशनल लेव्हल वर खेळणार आहे मागील 8 महिन्यात तिने जिल्हा पातळी, राज्य पातळीवर झेप घेतली. या पूर्वी तिने शिवाजी कॉलेज परभणी, नंदुरबार व धुळे येथे मॅचेस खेळली आहे रशीद इंजिनिअरिंग स्पोर्ट्स अकॅडमी च्या मार्गदर्शन खाली ती प्रशिक्षण घेत आहे तिच्या या यशाबद्दल होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीजचे  अरुणकुमार ओझा, डॉ पवन चांडक, डॉ सौ आशा चांडक, प्रा शिवा आयथळ, चंद्रकांत राजुरे, संदीप भंडे, सौरभ भंडे यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या काळात राष्ट्रीय पातळीवर खेळताना तिला जी पण मदत लागेल ती मदत होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज तिला मदत करणार आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या