💥राज्यासह संपूर्ण देशात लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा तात्काळ लागू करण्यात यावा....!


💥हिंगोली जिल्ह्यात हिंदु संघटना संतत्प : या संदर्भात सेनगाव तहसील कार्यालयावर हिंदू धर्मरक्षणासाठी मूक मोर्चाचे आयोजन💥 

शिवशंकर निरगुडे - हिंगोली 

'देशामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशिर लव्ह जिहाद आणि धर्मांतरण विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करावा या संदर्भात सेनगाव तहसीलवर हिंदू धर्मरक्षन मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

देशामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर धर्मांतर तसेंच लव्ह जिहाद सारख्या षडयंत्राना आळा घालण्यासाठी कठोर कायदा या प्रमूख मागणी साठी दि 24/11/2022 रोजी सकाळी 11 वाजता सेनगाव येथे हिंदू धर्मरक्षन मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे हा मूक मोर्चा आप्पास्वामी प्रवेशद्वार ते तहसील कार्यालय सेनगाव येथे निघणार आहे तरी तालुक्यातील सर्व हिंदू धर्मातील महिला पुरुष यांनी या मूक मोर्चात सहभागी व्हावे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या