💥पुर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिककर्ज नूतनीकरण करून बँकेने राबवलेल्या योजनेचा लाभ घ्यावा - उपव्यवस्थापक नितीन श्रोत्री


💥तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्रशी जोडलेली सर्व गावातील प्रत्यक्ष शेतकरी संपर्क अभियान असा उल्लेखनीय उपक्रम सुरू💥

 पूर्णा (दि.२२ नोव्हेंबर) - येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे विभागीय कार्यालय लातूर येथील उपव्यवस्थापक नितीनश्रोत्री व शाखा व्यवस्थापक संजय कोळगणे यांनी पूर्णा शाखेतील आपल्या सहकाऱ्यांसह पिक कर्जनूतनीकरण मोहीम राबवली या मोहिमेत पूर्णा तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेशी जोडलेली सर्व गावे प्रत्यक्ष शेतकरी संपर्क अभियान असा उल्लेखनीय उपक्रम सुरू केला असून  फुकटगाव व कान्हेगाव या गावात पीक कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहकार्य केले असून आत्तापर्यंत चौदाशे शेतकऱ्यांचे पीक कर्ज नूतनीकरण करण्यात आले आहे माझी पंचायत समिती सभापती अशोक बोकारे माणिकराव बोकारे गंगाधर बोकारे तसेच गोपाळ मोरे अविनाश नवघरे सदाशिव नवघरे प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

पीक कर्ज नूतनीकरण व वसुली मोहीम यशस्वी करण्यासाठी माने,विनोद ठाकूर,धम्मा गायकवाड,भिसे आदींनी सहकार्य केले. त्याचप्रमाणे  तालुक्यातील विविध गावातही याचप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी सहकार्य करावे व आपले पीक कर्ज नूतनीकरण करून घ्यावे.यामुळे होणारे शेतकऱ्यांचे फायदे अत्यंत हितकारक असून शेती शेती निगडीत अनेक योजना आहेत शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा व बँकेने राबवलेल्या योजनेला अनुकूल असे सहकार्य करावे असे  आव्हान शाखाधिकारी संजय कोळगणे  यांनी केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या