💥परभणी जिल्हा पोलिस दलातील अप्पर पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांची नागपूरला बदली....!


💥सुदर्शन यांची नागपूर शहर पोलिस उपायुक्त म्हणून करण्यात आली बदली💥

परभणी (दि.०७ नोव्हेंबर) - परभणी जिल्हा पोलिस दलातील अप्पर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांची नागपूर शहर पोलिस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. 

त्यांच्या या रिक्त जागी हिंगोली येथून यशवंत अशोक काळे यांची अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने पोलिस अधीक्षक दर्जाच्या भारतीय पोलिस सेवा व राज्य पोलिस सेवेतील अधिका-यांच्या बदल्या व पदस्थापनेबाबतचा आदेश लागू केला. त्यात राज्यातील एकूण १०४ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी या संबंधीचे आदेश लागू केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या