💥गंगाखेड शहरातील क्रिडा संस्कृती वाढणं गरजेचं - गोविंद यादव


🔹आ. वरपुडकर चषक व्हॉलीबॉल स्पर्धेचा शुभारंभ 🔹

गंगाखेड : शहराला धार्मीक, सांस्कृतीकतेचा संपन्न वारसा आहेच. याच जोडीने शहरातील क्रिडा संस्कृती वाढणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी केले. गंगाखेड येथे आयोजीत आ. सुरेश वरपुडकर चषक व्हॉलीबॉल स्पर्धेच्या ऊद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. 


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऊपप्राचार्य चंद्रकांत सातपुते सर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक कलीमभाई, पत्रकार भीमराव कांबळे, नामदेव ( गोटू ) डमरे ऊपस्थित होते. प्रा. चंद्रकांत सातपुते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, गोविंद यादव यांच्या हस्ते बॉल फीत कापून आणि कलीमभाई यांच्या हस्ते नाणेफेक करून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. ज्ञानोपासक महाविद्यालय, परभणी विरुद्ध गोदावरी तांडा या दोन संघांत शुभारंभाचा सामना रंगला. जिल्ह्यासह मराठवाड्यातील १९ संघ सहभागी झाले असून हे सामने दिवस - रात्र पद्धतीने खेळवले जाणार आहेत. प्रा. सातपुते यांनी शहरातील क्रिडा क्षेत्राच्या प्रगतीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट केले. तर श्री यादव यांनी याकामी शक्य ते सर्व सरकार्य करण्याची हमी दिली. 


स्पर्धेचे प्रथम पारितोषिक कॉंग्रेस शहराध्यक्ष शेख युनूस यांच्या वतीने २१ हजार रूपये, द्वितीय पारितोषिक तुषार गोळेगावकर यांच्या वतीने ११ हजार रूपये तर गोविंद यादव यांच्या वतीने ५१११ रूपये डिसिप्लीन ॲवार्ड दिले जाणार आहे. ऊद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोविंद साळवे सर यांनी केले.  संयोजक गुणवंत कांबळे, चंद्रमुनी साळवे, सोहेल पटेल, अमोल जगतकर, अमोल जगतकर, शिवम पाटील, सौरभ रापतवार, पृथ्वीराज आडे, करण मुंडे, शिवम मुरकुटे, अभिजीत पालमकर, शिव मुरकुटे, आकाश कांबळे, नागेश घोडके, तुषार डाके, गुरूदास काडवदे, गौतम पाटील आदि स्पर्धा यशस्वीतेसाठी परीश्रम घेत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या