💥जिंतूर तालुक्यात बिबट्या दिसल्यास नागरिकांनी वन विभागाशी संपर्क साधावा....!

(फाईल चित्र)

💥असे आवाहन विभागीय वनाधिकारी अरविंद जोशी यांनी केले आहे💥

परभणी (दि.25 नोव्हेंबर) : जिंतूर तालुक्यातील नेमगिरी वन उद्यानाजवळील विजयनगर तांड्याजवळ मारोतराव डफडे यांच्या वासरावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता वन विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन विभागीय वनाधिकारी अरविंद जोशी यांनी केले आहे. 

जिंतूर तालुक्यातील संबंधित वनक्षेत्रांतर्गंत येणाऱ्या परिसरातील शेतकरी, नागरिकांनी शेतीचे कामे करताना शेतामध्ये एकापेक्षा जास्त जणांनी जावे. रात्री शेतामध्ये जाणे अत्यावश्यक असल्यास पुरेशा प्रकाशाची सोय करावी. रात्री शेतामध्ये मोकळ्या जागेत जनावरे बांधू नयेत. शेतात जाताना हातात काठी ठेवावी. तसेच वन्यप्राणी दिसल्यास त्वरित वनविभागातील विभागीय कार्यालय, वनविभाग परभणी दूरध्वनी क्रमांक 02452-220455, क्षेत्रीय वनपाल आणि वनरक्षक आडगाव येथील बी. व्ही. सुर्यवंशी 96737364522 व ऐ. आर. जाधव, 8390514997, जिंतूर येथील युवराज शिंदे 7097313111 आणि आ. डी. खेटींग 9175707444 तसेच भोगाव येथील बी. के. दुधारे 9011285953 आणि शेख अमीर शेख 8007006191 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या