💥परभणी जिल्ह्यात स्वराज्य संघटनेची उभारणी करण्यासाठी आलेल्या युवराज छत्रपती संभाजी राजे यांचे अभूतपूर्व स्वागत....!


💥स्वराज्य संघटनेच्या बांधणीसाठी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे प्रथमच जिल्ह्यात आले💥 

परभणी (दि.१९ नोव्हेंबर) : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज रायुवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे आज शनिवार दि.१९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी परभणी जिल्ह्यात आगमन होताच ठिकठिकाणी त्यांचे मोठ्या जल्लोषात अभूतपूर्व स्वागत करण्यात आले. स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरीकांनी गर्दी केली होती. छत्रपती संभाजीराजे भोसले यांचे स्वागत करण्यासाठी तरूणांची प्रचंड गर्दी झाली होती. तसेच महिलांचा सहभाग देखील लक्षणीय होता.


                    स्वराज्य संघटनेच्या बांधणीसाठी माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे प्रथमच जिल्ह्यात आले असता पुर्णा तालुक्यातील माखणी या गावी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या स्वागतानिमित्त गावात प्रत्येक घरासमोर आकर्षक रांगोळी काढून सजावट करण्यात आली होती. छत्रपती संभाजीराजे भोसले यांंना सजवलेल्या बैलगाडीत बसवून ढोलताशांच्या गजरात, लेझीम पथकासह पुष्पवृष्टी करत पारंपरिक पद्धतीने रयतेने अभुतपुर्व असे स्वागत केले.  याठिकाणी महिलांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात होता.

                   ताडकळस येथे धानोरा चौकात व बसस्थानक ठिकाणी  छत्रपती संभाजीराजे यांचे मोठ्या उल्हासात स्वागत करण्यात आले. यावेळी स्वागतासाठी तरूणांचा जनसागर उमडला होता. राजेंचा सत्कार व त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तरूणांची मोठी गर्दी झाली होती. माखणी व ताडकळस येथील जनतेच्या प्रेमाने छत्रपती संभाजीराजे भारावून गेले होते.

                  जिल्ह्यात स्वराज्य संघटनेची उभारणी करण्यासाठी प्रवक्ते करण गायकर, संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माधवराव देवसरकर,  स्वराज्य संघटनेचे प्रदेश निमंत्रक गंगाधरराव कळकुटे, आप्पासाहेब कुढेकर, मंगेश कदम, साहेबराव कल्याणकर, नितीन देशमुख व माधवराव आवरगंड यांनी परिश्रम घेतले. गावोगावी जावून स्वराज्य संघटनेची भूमिका समजावली. त्यांना जनतेने उस्फूर्त पाठिंबा दर्शविला. शनिवार दि. 19 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याहस्ते  माखणी, ताडकळस, एकरूखा, खांबेगाव, गणपुर, ममदापुर, कानेगाव, फुकटगाव, खुजडा, आडगाव, देगाव, आहेरवाडी, कात्नेश्‍वर आदी ठिकाणी स्वराज्य संघटनेची मुहूर्तमेढ रोवली गेली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या