💥श्रद्धा वालकर हत्याकांड खटाला विशेष जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला फाशी द्या......!


💥प्रहार जनशक्ती पक्षाची महामाहीम राष्ट्रपती कडे निवेदना द्वारे मागणी💥

परभणी - नुकताच दिल्ली येथे घडलेल्या दुर्दैवी श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्याकांडामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट असून घडलेली घटना संपूर्ण मानवजातीस कलंकित करणारी आहे. या घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे.

अफताब अमीन पुणावाला या विकृत मानसिकतेच्या तरुणाने केलेले भीषण कृत्य अत्यंत अघोरीं आणी चिड आणणारे आहे. घडलेला प्रकारा बद्दल कुठल्या एका जाती धर्माला गृहीत धरणे चुकीचे आहे, घडलेला प्रकार हा अत्यंत निंदनीय आणी संपूर्ण मानवजातीला कलंकित करणारा आहे. या बाबत सम्पूर्ण मानवजातीने एकत्रित येऊन आफताब सारखी विकृत मानसिकता समाजातून ठेचून काढली पाहिजे त्या साठी समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येणे गरजेचे आहे.

झालेला प्रकार अत्यंत निंदनीय असून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने या घटनेचा निषेध करत आज भारताचे महामाहीम राष्ट्रपती यांना एक निवेदन पाठयून श्रद्धा वालकर हत्याकांड खटला विशेष जलदगती न्यायालयात चालवून आरोपी अफताब अमीन पुनावाला यास फाशी देण्याची मागणी करण्यात आली. महामहीम राष्ट्रपती यांना मा. जिल्हाधिकारी परभणी यांच्या मार्फत सबंधित निवेदन पाठवण्यात आले आहे.

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रहार शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हा प्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके पाटील, सर्कल प्रमुख श्याम भोंग, शहर चिटणीस वैभव संघई, महिला आघाडी शहर चिटणीस ऍड सुवर्णाताई देशमुख, महिला आघाडी उपशहर प्रमुख सुषमाताई देशपांडे, उद्धव गरुड, शेख बशीर, सय्यद युनूस, तसलीम पठाण, रजिया पठाण, यास्मिन पठाण आदींच्या स्वाक्षर्या आहेत......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या