💥दिशा सालियन प्रकरणात सीबीआयने केला मोठा खुलासा....!


💥आता सीबीआयने सांगितलं दिशा सालियनच्या मृत्यूचं नेमकं कारण💥 

✍️ मोहन चौकेकर 

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा वाढवला होता. या प्रकरणात भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणेंपासून अनेकांनी गंभीर आरोप केले. राणेंनी या प्रकरणात शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवरही गंभीर आरोप केले.मात्र,आता या प्रकरणात सीबीआयने मोठा खुलासा केला आहे सीबीआयने सादर केलेल्या अहवालात दिशाचा मृत्यू अपघातीच होता,असं स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे दिशाने आत्महत्या केल्याचा, बलात्कार झाल्याचा आणि खून झाल्याचे सर्व आरोप खोटे ठरले आहेत.

*सीबीआयने अहवालात नेमकं काय म्हटलं ?

सीबीआयने दिलेल्या अहवालात दिशा सालियनचा दारूच्या नशेत तोल गेल्यानं आणि १४ व्या मजल्यावरून पडून डोक्याला गंभीर इजा झाल्यानं मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे.....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या