💥परभणीत बेधडक मोर्चातून शिवसेनेचे जोरदार शक्तीप्रदर्शन.....!


💥मातब्बर नेतेमंडळीसह शेकडो पदाधिकारी, हजारों शिवसैनिक,शेतकरी,शेतमजूर या भव्य मोर्चात सहभागी💥

परभणी (दि.14 नोव्हेंबर) - शेतकरी व शेतमजुरांच्या मागण्यांसाठी शिवसेनेने आपल्या बालेकिल्ल्यात आज मंगळवार दि.15 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजीत केलेल्या बेधडक मोर्चातून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. मातब्बर नेतेमंडळीसह शेकडो पदाधिकारी, हजारों शिवसैनिक,शेतकरी,शेतमजूर या भव्य मोर्चात सहभागी होते.

शनिवार बाजारापासून या मोर्चास प्रारंभ झाला. तत्पुर्वी सकाळपासूनच  संपूर्ण जिल्ह्यातून कानोकोप-यातून हजारों शिवसैनिक, शेतकरी व शेतमजूर वाहनांद्वारे या मैदानावर दाखल होत होते. या शिवसैनिकांतील उत्साह अभूतपूर्व होता. गळ्यातील भगवे रूमाल व हातात भगवे झेंडे फडकावून घोषणाबाजी करणा-या शिवसैनिकांनी परभणीकरांचे लक्ष वेधून घेतले. जिंतूर, पाथरी, गंगाखेड, वसमत रस्त्यावरून सकाळपासून शेकडो वाहनाद्वारे येणा-या शिवसैनिकांच्या ताफ्यामुळे त्या-त्या रस्त्यावरील वाहतुक कोलमडली. शिवसैनिकांनी शनिवार बाजारात कूच केली तेव्हा शनिवार बाजाराचे मैदान शिवसैनिकांमुळे अक्षरक्षः फुलले होते. भगवेमय झाले होते. शिवसैनिकांतील हा अभूतपूर्व उत्साह ओळखून नेतेमंडळीत सुध्दा अक्षरक्षः संचारले होते. या शनिवार बाजारात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख रविंद्र वायकर, खासदार संजय जाधव व आमदार डॉ.राहुल पाटील यांच्यासह नेतृत्वाखाली जिल्हाप्रमुख विशाल कदम, जिल्हाप्रमुख सुरेश ढगे, सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर यांच्यासह अन्य पदाधिकारी दाखल झाले तेव्हा शिवसैनिकांनी गगनभेदी घोषणा दिल्या.

शनिवार बाजारातून मोर्चास प्रारंभ झाला. नेतेमंडळी या मोर्चाच्या अग्रभागी होती. त्या पाठोपाठ शिवसैनिकांचे जथ्थेच्या जथ्थे होते. शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत बाजारपेठ अक्षरक्षः दणाणून सोडली. बॅण्डच्या तालावर उत्साही शिवसैनिकांनी भगवे झेंडे फडकावून बेभान नृत्य करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. छत्रपती शिवाजी महाराज रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, गुजरी बाजार, अष्टभुजा चौक, नारायण चाळ कॉर्नर, विसावा कॉर्नर, स्टेशनरोड मार्गे मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरातील मैदानावर पोहचला. तेव्हा मोर्चातील शिवसैनिकांच्या उत्साहास अक्षरक्षः उधाण आले होते. या मैदानासह या भागातील सर्व रस्ते भगवेमय झाले होते. त्यामुळे या भागातील वाहतूकही काही तास ठप्प राहिली. मोर्चातील अभूतपुर्व उत्साह व गगनभेदी घोषणांमुळे बालेकिल्ल्यातील जुन्या स्मृती जाग्या झाल्या. कोरोनातील दोन वर्ष, त्या पाठोपाठ राज्यातील खळबळजनक राजकीय घडमोडीच्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचा मंगळवारचा बेधडक मोर्चा परभणीकरांसह राजकीय वर्तुळाच्या दृष्टीने उत्कंठता वाढविणाराच होता.

☀️गगनभेदी घोषणा ठरल्या लक्षवेधी :-

या मोर्चातील शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत बाजारपेठ दणाणून सोडली. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, जय भवानी, जय शिवाजी, हिंदूहदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, आवाज कोणाचा शिवसेनाचा, कोण आला रे कोण आला शिवसेनाचा वाघ आला. कोण म्हणत देतं नाही घेतल्या शिवाय राहणार नाही. पीक विमा हक्काचा नाही कोणाच्या बापाचा या घोषणा बरोबर राज्य सरकारच्या विरोधात 50 खोके एकदम ओके, कृषीमंत्र्यांचे करायचे काय खाली मुंडक वर पाय या घोषणांनी परभणीकरांचे लक्ष वेधले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या