💥आता वेगळा मराठवाडा झाल्याशिवाय मराठवाड्याचा विकास होणार नाही....!


💥स्वतंत्र मराठवाडा राज्य होण्यासाठी जनआंदोलन उभारणार - मास्टर अनिल कांबळे

 मराठवाडा( मध्य महाराष्ट्र )जनविकास प्रबोधन परिषद याचे मुख्य संयोजक अडवोकेट डॉ .यशवंत कुमार कसबे यांनी 26 नोव्हेंबर 2022 रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह औरंगाबाद येथे होत असलेल्या मराठवाडा स्वतंत्र झाला तेव्हापासून मराठवाड्याचा विकास झाला का नाही?  याच प्रबोधन व ज्यांणी मराठवाडा विकासासाठी योगदान दिले त्यांना मराठवाडा भूषण, मराठवाडा रत्न पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास * प्रमुख वक्ते* म्हणून मला बोलवले आहे adv, dr. यशवंत कुमार कसबे साहेब व मराठवाडा जनविकास प्रबोधन परिषद सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद! ज्यांना ज्यांना वाटतं वेगळा मराठवाडा झाला पाहिजे त्या सर्वांनी जात,धर्म,पक्ष राजकारण सर्व बाजूला ठेवून मराठवाड्याच्या विकासासाठी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती

स्थळ :-यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पैठण गेट औरंगाबाद 

दिनांक :-26 नोव्हेंबर 2022 

वेळ:- दु 12ते 5

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या