💥परभणी शहरातील सरफराज नगर येथील हरवलेल्या इसमाची माहिती देण्याचे आवाहन....!


💥याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात मि.क्र.53/2022 प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे💥

परभणी (दि. 15 नोव्हेंबर) : परभणी शहरातील सरफराज नगर येथील इसम विजय बापुराव बोराडे अंदाजे वय 50 वर्ष हे दि.22 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 8 वाजेपासून त्यांच्या राहत्या घरातून शनिवार बाजार येथे मजुरीचे काम पाहण्यासाठी गेले असता आजपर्यंत घरी परत आलेले नाहीत. याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात मि.क्र.53/2022 प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली आहे. इसमाचा रंग सावळा, चेहरा गोल मोठा, मिशी व दाढी पांढरी, उंची जवळपास 5 फुट 1 इंच, बांधा मध्यम, केस पांढरे, पोशाख - फिक्कट फुल भायाचा शर्ट, काळ्या रंगाची पँट अश वर्णनाचे इसम असून त्याला मराठी भाषा अवगत आहेत. या वर्णनाचा इसम दिसून आल्यास संबंधीतानी नानलपेठ पोलिस ठाणे, परभणी (मो. 8208992942)  यांच्याशी संपर्क साधावा, असे पोलिस निरीक्षक, नानलपेठ पोलिस ठाणे, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या