💥परभणी जिल्ह्यात नूतन जिल्हा पोलिस अधिक्षक मा.रागसुधा मेडम गुटखाबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणार का ?💥संभाजी सेना नेते अरूण पवार यांनी उपस्थित केला प्रश्न💥

परभणी (दि.०६ नोव्हेंबर) - राज्यात सर्वत्र गुटखाबंदी कायदा लागू असतांना देखील परभणी जिल्ह्यात सर्वत्र खुलेआम अवैध गुटख्याची विक्री होतांना पहावयास मिळत असून अन्न व औषधी प्रशासनाचे अधिकारी/कर्मचारी मात्र कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन गुटखाबंदी कायद्यावर अवैध गुटखा विक्रेत्यांशी हात मिळवनी करून लघूशंका करीत असल्याचे निदर्शनास येत आहे.

 जिल्ह्यात गुटखाबंदी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी याकरिता सामाजिक कार्यकर्ते तथा संभाजी सेनेचे धाडसी नेते अरुण पवार सन २०१७ पासून नियमित या विषया सांदर्भात आंदोलन करत आहेत जिल्ह्यात नव्यानेच रुजू झालेल्या नुतन जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर या परभणी जिल्ह्यात सर्वत्र अवेध गुटखा विक्री ही रजरोस पणे सुरु असल्यामुळे या विरोधात कठोर पाऊल उचलून गुटखाबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करतील काय असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे.

या अवैध गुटखा विक्रीत काही तत्वभ्रष्ट राजकारण्यांचे देखील हात असल्याची व त्यांना अन्न व औषधी प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांची देखील मुकसंमती असल्याची जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेत कुरबूर असल्याचे ही ते म्हणाले त्यामुळेच परभणी जिल्ह्यात अवैध गुटखा विक्री व अवैध गुटखा तस्करी मोठी कारवाई होत नाही आणी जी होते थातूर मातुर स्वरूपात असते त्या कारवाईना बगल देऊन खऱ्या रूपाने परभणीच्या नुतन पोलिस अधिक्षक श्रीमती रागसुधा आर या कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करीत गुटखा बंदी कायद्या नुसार हा संघटीत गुन्हा असल्यामुळे अवैध गुटखा विक्रेत्यांवर 'मकोका' या कायद्या नुसार कारवाया करतील का ?  व परभणीत गुटखा बंदी कायदा अंमलात आणतील का ? असा प्रश्नही सामाजिक कार्यकर्ते पवार यांनी उपस्थित केला.....

                           

                             

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या