💥महापुरुषांच्या अवमान करणाऱ्या राज्यपालांना हटवा जिंतूर शिवप्रेमींनी निवेदनाद्वारे केली मागणी....!


💥शिवप्रेमी नागरिकांनी राष्ट्रपतींकडे आज सोमवार दि.२१ नोव्हेंबर रोजी केली मागणी💥

जिंतूर प्रतिनिधी /  बि.डी. रामपूरकर

जिंतूर : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल मागील काही दिवसांपासून महापुरुषांचा बदल बेताल वक्तव्य करून अवमान करत असल्यामुळे राज्यपालांना तत्काळ हटविण्याची मागणी शिवप्रेमी नागरिकांनी राष्ट्रपती यांच्याकडे दि. २१ नोव्हेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्राचे राज्यपाल मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील महापुरुषांचा बदल अवमानकारक वक्तव्य करत आहेत त्यातच औरंगाबाद येथील विद्यापीठातील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत अवमानकारक विधान केले आहे छत्रपती शिवाजी महाराज अखंड भारताचे आदर्श आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरुण पिढीला दिशा दर्शक ठरतो म्हणून महाराष्ट्रात महाराजांना आदर्श मानले जाते परंतु राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोषारी मागील काही दिवसांपासून गरळ ओकत आहेत यामुळे महाराष्ट्राची बदनामी तर होतच आहे परंतु महापुरुषांचा अवमान होत असल्यामुळे शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या जात आहेत म्हणून वादग्रस्त राज्यपाल भगतसिंग कोषारी यांची तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी तहसीलदार मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे या निवेदनावर विविध सामाजिक राजकीय, संघटनेच्या पदाधिकारी व शिवप्रेमी नागरिकांच्या सह्या आहेत...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या