💥ऊर्दू शैक्षणिक क्षेत्रात गुंणवता वाढविण्यासाठी समाजसेवकांनी पुढाकार घ्यावा - शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे


💥या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकरम बाबा सिद्दीकी हे होते💥 

परभणी :- शहरातील दर्गा परिसरातील पारवा रोड येथील हाजी हमीद काॅलनी या ठिकाणी लोकश्रेय मित्र मंडळ संचलित सीजा ऊर्दू बालवाडी चे उदघाटन प्रा शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी शिक्षणाधिकारी भुसारे यांनी उर्दू शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय व गुणवंता वाढविण्यासाठी समाजसेवकांनी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन  केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अकरम बाबा सिद्दीकी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक सय्यद नौमान हुसेन कौसर शिव अल्प संख्याक  सेना शहर प्रमुख  महोंमद अब्दुल्ला राज समाज हित न्युज चॅनेल चे संपादक प्रमोद अंभुरे यांची उपस्थिती होती या वेळी सय्यद नौमान हुसेन कौसर अब्दुल्ला राज अकरम बाबा सिद्दीकी विठ्ठल भुसारे सलीम इनामदार यांची समयोचित भाषणे झाली प्रस्ताविक लोकश्रेय मित्र ममंडळ चे संस्थापक अध्यक्ष सलीम इनामदार यांनी केले तर सूत्रसंचलन शेख अयुब शेख अल्लाबक्ष यांनी केले तर अभार प्रदर्शन लोकश्रेय चे शहराध्यक्ष खयुम बेग यांनी मानले  या वेळी  शेख फर्मान सागर मुंडे ईरफान खान शेख अझर अकबर ईनामदार यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम शेख सद्दाम दानीश इनामदार व खान यांनी घेतले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या