💥आदर्श आचारसंहितेमुळे सेलू औद्योगिक वसाहतीबाबतची बैठक तूर्तास रद्द.....!


💥उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सेलूतील औद्योगिक वसाहत स्थापने संदर्भात मंत्रालयात पार पडली आढावा बैठक💥

परभणी (दि.10 नोव्हेंबर) : जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे सेलू औद्योगिक वसाहतीसाठी हदगाव, रवळगाव, पिंप्रोळा येथील भू-संपादनासंबंधी 19 नोव्हेंबरला होणारी आढावा बैठक तूर्तास पुढे ढकलण्यात आली आहे. 

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली सेलू येथे औद्योगिक वसाहत स्थापन करण्याबाबत मंत्रालयात नुकतीच आढावा बैठक पार पडली होती. या बैठकीला आमदार मेघना बोर्डीकर, जिल्हाधिकारी आंचल गोयल, प्रादेशिक अधिकारी, औद्योगिक विकास मंडळ, नांदेड, उपविभागीय अधिकारी यांच्यासह तहसीलदार उपस्थित होते.

भूधारक शेतकरी यांच्यासमवेत चर्चा करुन औद्योगिक विकासाचे महत्त्व व त्यानुसार उपलब्ध होणारा रोजगार याबाबत समजावून कार्यवाही करण्याबाबत सूचित केले होते. त्यानुषंगाने उपविभागीय अधिका-यांनी सेलू येथे ही बैठक आयोजित केली होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या